AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात

आयपीएल 2026 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हा पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दोन्ही संघांनी 155 धावा केल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. हा सामना कोलकात्याने जिंकला.

IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2026 | 11:58 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 155 धावा केल्या आमि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना लखनौ सुपर जायंट्सची पुरती वाट लागली. हा सामना शेवटच्या षटकात गेला. या षटकात 17 धावांची गरज असताना लखनौ सुपर जायंट्सने 16 धावा केल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यामुळे या सामन्यात काय निकाल लागणार याची उत्सुकता होती. सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण त्यांना एकच धाव करता आली आणि विजयासाठी 2 धावा दिल्या. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून जिंकला.

लखनौचा डाव आणि सहा चेंडू

कोलकाता नाईट रायडर्सने सुपर ओव्हर सुनील नसरीनच्या हाती सोपवलं. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूर आणि एडन मार्करम ही जोडी मैदानात उतरली. पहिल्याच चेंडूवर नरीनने निकोलस पूरनला तंबूत पाठवलं. त्यानंतर शेवटची विकेट म्हणून ऋषभ पंत मैदानात उतरला. दुसऱ्या चेंडूवर पंतने एक धाव घेतली आणि मार्करमला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर मार्करमने जोरदार प्रहार केला. त्याने षटकाराच्या दिशेने फटका मारला. पण रोवमॅन पॉवेलने झेल पकडला आणि चेंडू आत फेकला. हा चेंडू रिंकूने पकडला आणि मार्करम बाद झाला. अप्रतिम झेल घेतल्याने लखनौ सुपर जायंट्सचा डाव 1 धावेवर लखनौचा खेळ आटोपला. तसेच विजयासाठी 2 धावांचं आव्हान मिळालं.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

कोलकात्यासमोर विजयासाठी फक्त 2 धावांचं आव्हान होतं.  कोलकात्याकडून रिंकु सिंह आणि रोवमॅन पॉवेल ही जोडी मैदानात उतरली. तर लखनौ सुपर जायंट्सने सुपर ओव्हर प्रिन्स यादवला दिलं. स्ट्राईकला रिंकु सिंह होता आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर कोलकात्याचा विजय झाला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात 2 गुण पडले आहे. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?