AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपर 4 फेरीत काय करणार? अँडी पायक्रॉफ्टचं भूत पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मानगुटीवर

आशिया कप 2025 पाकिस्तान आणि अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात 36 चा आकडा असल्याचं दिसून आलं आहे. भारत पाकिस्तान सामन्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलं. पाकिस्तान युएई सामना याच कारणामुळे उशिराने सुरु झाला होता. आता पुन्हा एकदा अँडी पायक्रॉफ्टचं भूत पाकिस्तानच्या मानगुटीवर बसणार आहे.

सुपर 4 फेरीत काय करणार? अँडी पायक्रॉफ्टचं भूत पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मानगुटीवर
सुपर 4 फेरीत काय करणार? अँडी पायक्रॉफ्टचं भूत पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मानगुटीवरImage Credit source: PTI
| Updated on: Sep 20, 2025 | 5:02 PM
Share

आशिया 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता तर आहे. पण सामनाधिकाऱ्याची भूमिका कोण बजावणार याबाबतची चर्चा रंगली आहे. असं असताना ही जबाबदारी पुन्हा एकदा सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आता काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 21 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. कारण अँडी पायक्रॉफ्ट यांच्या नियु्क्तीमुळे पाकिस्तानची पोटदुखी झाली आहे. पाकिस्तानने साखळी फेरीतील सामन्यातील हँडशेक प्रकरणासाठी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांची स्पर्धेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

अँडी पायक्रॉफ्ट हे पाकिस्तान आणि युएई सामन्यात सामनाधिकारी होते. त्यामुळे पाकिस्तानने त्यांची हकालपट्टी करण्याची नाटकी सुरु केली होती. सामना खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. आयसीसीकडे विनंती केली होती की, त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढा. पण आयसीसीने पाकिस्तानच्या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर आला. त्यानंतर या प्रकरणावर अँडी पायक्रॉफ्ट यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर पाकिस्तान मान खाली घालून सामना खेळला. दुसरीकडे, पाकिस्तान मीडियातून दावा केला गेला की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली होती. त्यानंतर सामना सुरु झाला होता. पण पाकिस्तानचा हा दावाही खोटा निघाला होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. पण आयसीसी आणि आशिया मल्टी नॅशनल स्पर्धेत भारतीय संघ सामने खेळतो. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली होती. यासाठी पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. पीसीबीने दावा केला की पायक्रॉफ्टने सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांना टॉस दरम्यान हस्तांदोलन करू नये असे सांगितले होते .

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट