AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : Anushka Sharma ची विराट बर्थ डे निमित्त खास पोस्ट

IND vs SA : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली याने सचिनच्या विक्रमासोबत बरोबरी केली. खास म्हणजे त्याचा आज वाढदिवस असल्याने आजचा दिवस खास होता. विराटसाठी त्याची पत्नी अनुष्काने खास पोस्ट केली आहे.

Virat Kohli : Anushka Sharma ची विराट बर्थ डे निमित्त खास पोस्ट
| Updated on: Nov 05, 2023 | 8:51 PM
Share

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. विराट प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. विराटसाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने विराटचे तीन फोटो शेअर केले आहेत.

अनुष्का शर्माची पोस्ट

विराट त्याच्या आयुष्यामधील प्रत्येक भूमिका चांगल्याप्रकारे निभावत आहे. माझं तुझ्यासह या जीवनात आणि त्याही पलीकडे आणि अविरतपणे प्रेम आहे, असं अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विराट आणि  अनुष्का यांनी 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. दोघांना दोन वर्षांची मुलगी असून तिचं वामिका असं नाव आहे.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यामध्ये शतक करत सचिन तेंडुलकरच्या विक्रमासोबत बरोबरी केली आहे. विराटने या सामन्यामध्ये नाबाद 101 धावांची खेळी केली. भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत 326 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये विराटने सर्वाधिक 101 धावा आणि श्रेयस अय्यर 77 धावा केल्या होत्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रकेच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. या विजयासह भारताने पॉईंट टेबलमध्ये आपलं पहिलं स्थानं कायम ठेवलं असून वर्ल्ड कपमध्ये सलग आठवा विजय मिळवला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.