Ashes : चौथा कसोटी सामना दोन दिवसात संपला, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला 14 वर्षानंतर धोबीपछाड

एशेज कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकण्यात अखेर इंग्लंडला यश आलं आहे. मालिका गमावली असली तर व्हाईट वॉशचं संकट टळलं आहे. विशेष म्हणजे चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसातच संपला.

Ashes : चौथा कसोटी सामना दोन दिवसात संपला, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला 14 वर्षानंतर धोबीपछाड
Ashes : चौथा कसोटी सामना दोन दिवसात संपला, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला 14 वर्षानंतर धोबीपछाड
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 27, 2025 | 3:18 PM

एशेज कसोटी मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यात विजयाचा हेतूने मैदानात उतरले होते. दुसरीकडे इंग्लंडवर व्हाईट वॉशचं संकट घोंघावत होतं. पण चौथ्या कसोटी सामन्यात कमाल झाली. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडने कमाल केली आणि सामना चार गडी राखून जिंकला. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-3 अशी स्थिती झाली आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 152 धावांवर रोखलं. त्यानंतर पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 110 धावांवर सर्व बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 42 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 132 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने दुसऱ्याच दिवशी 6 गडी गमवून पूर्ण केलं.

बॉक्सिंग डे कसोटी दोन दिवसातच संपली

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या खेळपट्टीवर जवळपास 10 मिलीमीटर गवत होतं. त्यामुळे गोलंदाजांना त्याची मदत झाली. इंग्लंडने हा अंदाज ओळखूनच प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या आघाडीनंतर हा सामना त्यांच्याच पारड्यात झुकलेला दिसला. पण दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त खेळी करत सामना जिंकला. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी 2011 मध्ये पराभूत केलं होतं. एशेजमधील हा सातवा कसोटी सामना होता ज्यात चौथ्या डावातील धावसंख्या सर्वाधिक होती आणि यशस्वीरित्या धावांचा पाठलाग करण्यात आलेला हा तिसरा सामना होता.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, ‘ज्यांना वाटले होते की हा क्लीनस्वीप असेल. मैदानावर आणि मैदानाबाहेर जे काही घडले आहे ते पाहता इंग्लंड सहजासहजी मागे हटेल, त्यांना हे आठवण करून देते की बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली ही टीम सहजासहजी हार मानणार नाही. हो, हा कलश मायदेशी परतणार नाही, परंतु इंग्लंड मेलबर्नला भरपूर अभिमानाने सोडतो. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 15 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे आणि ही कदाचित पुनरागमनाची ठिणगी असेल. ‘