
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एशेज सीरिजमधील पाचवा आणि अंतिम तसेच 2026 या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडच्या बाजूने या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार बेन स्टोक्स याने बॅटिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने घेतलेल्या एका निर्णयाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. स्टीव्हनच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्टीव्हनच्या या एका निर्णायमुळे 137 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं.
स्टीव्हन स्मिथ याने प्लेइंग ईलेव्हनबाबत घेतलेल्या एका निर्णयामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्टीव्हनने या पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्पेशालिस्ट स्पिनरचा समावेश केला नाही. ऑस्ट्रेलियाची स्पेशालिस्ट फिरकीपटूशिवाय खेळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऑस्ट्रेलियाची एशेज सीरिजमध्ये स्पेशालिस्ट फिरकीपटूशिवाय खेळण्याची ही सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ होती. ऑस्ट्रेलिया याआधीही स्पेशालिस्ट फिरकीपटूशिवाय खेळली आहे. मात्र सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये असं पहिल्यांदाच झालं.
ऑस्ट्रेलियाने पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये टॉड र्फी याच्या जागी ब्यू बेवस्टर याला संधी दिली. यासह ऑस्ट्रेलिया या सामन्यात स्पेशालिस्ट स्पिनरसह उतरणार नसल्याचं निश्चित झालं. ऑस्ट्रेलियाने यासह आपलाच रेकॉर्ड मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाची 137 वर्षांनंतर सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये स्पेशालिस्ट स्पिनरशिवाय खेळण्याची पहिलीच वेळ ठरली. ऑस्ट्रेलिया त्याआधी 1888 साली पहिल्यांदाच सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये स्पेशालिस्ट स्पिनरशिवाय खेळली होती.
इंग्लंडने पहिल्या दिवशी 200 पार मजल मारली. मात्र पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवशी निम्मा खेळही झाला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात 90 षटकांचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत पाऊस आणि खराब प्रकाशामुळे फक्त 45 षटकांचाच खेळ झाला.
सिडनीत 137 वर्षांनंतर काय झालं?
Beau Webster returns to the XI as Australia opt against picking a frontline spinner in Sydney for the first time in 138 years.
Full story: https://t.co/1xpR8scqzN pic.twitter.com/YMUjeiG0fm
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2026
दरम्यान इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 45 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 211 धावा केल्या. इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमधील पहिल्या 3 फलंदाजांना चांगल्या सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही.त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत जो रुट 72 तर हॅरी ब्रूक 78 धावांवर नाबाद परतले.