Asia cup 2022 Tickets : क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली, आजपासून IND vs PAK सामन्याच्या तिकीटांची विक्री, तिकीट कसं मिळणार? जाणून घ्या…

| Updated on: Aug 15, 2022 | 6:46 AM

Asia cup 2022 Tickets : भारतानं आशिया कपच्या इतिहासातील सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्ताननं 2 वेळा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. 

Asia cup 2022 Tickets : क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली, आजपासून IND vs PAK सामन्याच्या तिकीटांची विक्री, तिकीट कसं मिळणार? जाणून घ्या...
आजच्या समान्यात बदल होण्याची शक्यता
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  आशिया चषक (Asia cup 2022) 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सलामीच्या लढतीत भिडतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला दुबईत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येतील. दोन्ही देशांचे क्रिकेट (Cricket) चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 15 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ACC ने लिहिलंय की, ‘आशिया कप 2022 च्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल.’ यासोबतच ACC ने ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती देखील शेअर केली ज्याद्वारे चाहते आशिया कपसाठी तिकिटे खरेदी करू शकतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. तर पात्रता सामने ओमानमध्ये UAE, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात खेळले जाणार आहेत. त्याचा पहिला सामना 20 ऑगस्ट रोजी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे.

आशिया चषकाचं वेळापत्रक

श्रीलंकाऐवजी UAEमध्ये स्पर्धा

आशिया चषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर ही स्पर्धा यावर्षी श्रीलंकेत होणार होती. परंतु तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आयोजन समितीनं स्पर्धा हलविण्याचा निर्णय घेतला. UAE ला. याबाबत एसीसीनं एका निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती पाहता एसीसीने विस्तृत विचारविमर्शानंतर सर्वानुमते असा निष्कर्ष काढला आहे की ही स्पर्धा श्रीलंकेतून यूएईला हलवणे योग्य ठरेल.”

हे सुद्धा वाचा

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर

आशिया चषकापूर्वी भारतीय संघ 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळत नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही ६ महिन्यांनी संघात परतणार आहे.

7 वेळा आशिया कपचं जेतेपद

भारत आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंकेचा संघ 5 वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्ताननं 2 वेळा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. भारताने 4 वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.