Asia Cup 2022 : श्रीलंकेचा आशिया चषकाचं यजमानपद भूषवण्यास नकार, स्पर्धा भारतात की UAEमध्ये?

भारतामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात फारशी पेच राहणार नाही. तसं झाल्यास चाहत्यांना भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यासोबतच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे.

Asia Cup 2022 : श्रीलंकेचा आशिया चषकाचं यजमानपद भूषवण्यास नकार, स्पर्धा भारतात की UAEमध्ये?
Asia Cup 2022 भारतात की 'यूएई'मध्ये?
Image Credit source: social
| Edited By: | Updated on: Aug 03, 2023 | 1:11 PM

नवी दिल्ली :   श्रीलंका सध्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटनं (SLC) आशिया कप 2022 T20 (Asia Cup 2022) क्रिकेटचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेटनं बुधवारी आशिया क्रिकेट परिषदेला (ACC) ही माहिती दिली. तो म्हणाला की, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे तो T20 आशिया चषक आयोजित करण्याच्या स्थितीत नाही. आर्थिक संकटामुळे श्रीलंका प्रीमियर लीग (LPL) चा तिसरा टप्पाही पुढे ढकलण्यात आली आहे. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेनं म्हटलं आहे की, येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सहा संघांची एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्याची स्थिती नाही. त्यामुळे आता ही स्पर्धा कुठे होणार, असा पेच निर्माण झालाय. यानंतर दोन देशांची नावं समोर आली आहे. ती देश होणती ते पुढे जाणून घ्या…

स्पर्धा भारतात की UAEमध्ये?

एसएलसीनं सांगितले की, ते कोणत्याही देशात ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहेत. T20 विश्वचषकापूर्वी ACC या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकाबाबत येत्या काही दिवसांत मोठी घोषणा करू शकते. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत किंवा संयुक्त अरब अमिराती (UAE) यांना या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळू शकते. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर कोणताही देश यजमान बनू शकतो. ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ACC आणि श्रीलंका क्रिकेटला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी बोलून स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागेल.

बीसीसीआयनं काय म्हटलंय?

त्याचबरोबर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा आहेत. जय शहा हे बीसीसीआयचे सचिवही आहेत. अशा परिस्थितीत भारतामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात फारशी पेच राहणार नाही. तसं झाल्यास चाहत्यांना येथे भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यासोबतच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे.

अंतिम मान्यता गरजेची

एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर कोणताही देश यजमान बनू शकतो. ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ACC आणि श्रीलंका क्रिकेटला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी बोलून स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागेल.

आता आशिया कप 2022 नेमकी कुठे होणार. भारतात की युएईमध्ये, याची उत्सुकता लागून आहे.