AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan पुन्हा महामुकाबला, तारीख ठरली, जाणून घ्या सुपर-4 चं संपूर्ण शेड्युल

India vs Pakistan: क्रिकेट चाहते पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याचा रोमांच अनुभवणार आहेत. या महामुकाबल्याची तारीख निश्चित झाली आहे.

India vs Pakistan पुन्हा महामुकाबला, तारीख ठरली, जाणून घ्या सुपर-4 चं संपूर्ण शेड्युल
ind vs pak Image Credit source: twitter
| Updated on: Sep 03, 2022 | 7:44 AM
Share

मुंबई: क्रिकेट चाहते पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याचा रोमांच अनुभवणार आहेत. या महामुकाबल्याची तारीख निश्चित झाली आहे. आता फक्त रविवारची प्रतिक्षा आहे. पाकिस्तानने काल हाँगकाँगवर (PAK vs HKG) दणदणीत विजय मिळवला. आशिया कपच्या (Asia cup) ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना होता. या सामन्यात जिंकणारा संघ सुपर 4 साठी पात्र ठरणार होता. अपेक्षेप्रमाणे फेव्हरेट पाकिस्तानने या सामन्यात बाजी मारली. त्यामुळे सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढतीचा थरार रंगणार आहे.

सुपर 4 चे चार संघ ठरले

आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 चे चार संघ निश्चित झाले आहेत. अफगाणिस्तान सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. ग्रुप बी मध्ये त्यांनी बलाढ्य श्रीलंका आणि बांगलादेशला हरवलं होतं. त्यानंतर भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. भारताने ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, हाँगकाँगच्या टीमवर विजय मिळवला. ग्रुप बी मध्ये अखेरचा साखळी सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ होता. या मॅच मध्ये श्रीलंकेने बांगलादेशला नमवून सुपर 4 मध्ये प्रवेश केला. आता ग्रुप ए मधून पाकिस्तानने आपलं स्थान पक्क केलं आहे.

आजपासून सुपर 4 राऊंडची सुरुवात

सुपर फोरची सुरुवात शनिवारी 3 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला सामना श्रीलंका-अफगाणिस्तान मध्ये होणार आहे. अफगाणिस्तानने ग्रुप राऊंड मध्ये श्रीलंकेवर सहज विजय मिळवला होता. सुपर 4 मध्ये सगळ्यांना भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुक्ता आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे क्वचितच दोन्ही संघ आमने-सामने येतात. आशिया कपच्या निमित्ताने आठवड्याभरात दुसऱ्यांदा हे घडणार आहे.

अफगाणिस्तानकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा

भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होईल. त्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तान बरोबर लढत रंगेल. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानची टीम दमदार कामगिरी करतेय. अफगाणिस्तानकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे.

Asia Cup 2022: सुपर-4 चा शेड्युल

3 सप्टेंबर- श्रीलंका vs अफगानिस्तान (शारजाह) 4 सप्टेंबर- भारत vs पाकिस्तान (दुबई) 6 सप्टेंबर- भारत vs श्रीलंका (दुबई) 7 सप्टेंबर- पाकिस्तान vs अफगानिस्तान (दुबई) 8 सप्टेंबर- भारत vs अफगानिस्तान (दुबई) 9 सप्टेंबर- श्रीलंका vs पाकिस्तान (दुबई)

Follow Us
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...