IND vs PAK : ‘मला वाटतं की…’; विराट कोहली याने टीम इंडियाच्याच खेळाडूंना केलं अलर्ट!

वर्ल्ड कप 2022 मध्ये कोहलीने पाकिस्तानल एकट्याच्या दमावर पाणी पाजलं होतं. खास करून पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरीस रॉफ याला मारलेले दोन सिक्स सर्व जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात तसेच आहेत. विराटने उद्याच्या सामन्याआधीच पाकिस्तानचा गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.

IND vs PAK : मला वाटतं की...; विराट कोहली याने टीम इंडियाच्याच खेळाडूंना केलं अलर्ट!
virat kohli rohit sharma
| Updated on: Sep 01, 2023 | 4:26 PM

मुंबई : आशिया कप 2023 च्या थराराला सुरूवात झाली असली तरी खरी सुरूवात ही भारत-पाक सामन्यापासून होणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना 2 सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया आणि पाकिस्तान या हाय-वोल्टेज सामन्याची उत्सुकता आहे. या सामन्यात टीम इंडियाचा हुकमी एक्का विराट कोहलीकडुन सर्वा भारतीय चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत. वर्ल्ड कप 2022 मध्ये कोहलीने पाकिस्तानल एकट्याच्या दमावर पाणी पाजलं होतं. खास करून पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरीस रॉफ याला मारलेले दोन सिक्स सर्व जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात तसेच आहेत. विराटने उद्याच्या सामन्याआधीच पाकिस्तानचा गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाला विराट?

मला वाटतं की त्यांचा बॉलिंग लाईनअप मजबूत असून इम्पॅक्ट टाकणारे बॉलर आहेत. जे कोणत्या हीवेळी संपूर्ण सामन्याचं स्वरूप पालटू शकतात. अशा बॉलर्सचा सामना करण्यासाठी आम्हाला दमदार प्रदर्शनाची गरज असल्याचं विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीने जे वक्तव्य केलं आहे ते टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवायला हवं. पाकिस्तान एक मजबूत संघ असून बॅटर आणि बॉलरचा योग्य समतोल त्यांच्याकडे आहे. टॉप आर्डरने काहीवेळ मैदानावर टिकून राहायला हवं. लवकर विकेट गेल्याने संघावर दबाव येऊ शकतो. त्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसब शकतो.

दरम्यान, पाकिस्तानकडे शाहिनशाह आफ्रिदी, नसीम शहा, हॅरीस रॉफसारखे तगडे बॉलर आहेत. तर शादाब खानसारखा उत्कृष्ट स्पिनर आहे. नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने 151 धावांची दमदार खेळी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनाही पाकिस्तानच्या फलंदाजांना लवकरात लवकर आऊट करायला हवं. जर मोठ्या भागीदारी झाल्यातर टीमच्या पराभवासाठी तेवढं कारणस पुरेसं ठरु शकतं.

आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.