AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 च्या इतिहासात फायनलमध्ये सर्वाधिकवेळा ‘या’ संघाने मारली एन्ट्री, भारत कितव्या क्रमांकावर?

Asia Cup 2023 : श्रीलंका संघाने पाकिस्तावर विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारलीय. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक वेळा पाहा कोणत्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत कितव्या स्थानावर आहे जाणून घ्या.

Asia Cup 2023 च्या इतिहासात फायनलमध्ये सर्वाधिकवेळा 'या' संघाने मारली एन्ट्री, भारत कितव्या क्रमांकावर?
| Updated on: Sep 15, 2023 | 11:01 AM
Share

मुंबई : आशिया कप 2023 च्या सुपर 4 चा श्रीलंका आणि पाकिस्तानमधील पाचवा सामना रोमांचक ठरला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने बाजी मारली. श्रीलंका संघाचा हातून हा सामना पाकिस्तानने खेचूनच घेतला होता. मात्र शेवटच्या दोन चेंडूंवर संपूर्ण सामना फिरला. चुकून गेलेला चौकार आणि त्यानंतर चतुराईने दोन धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आशिया कपच्या 2023 च्या फायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.

कोणत्या संघाने कितीवेळा फायनलमध्ये केलाय प्रवेश?

पाकिस्तान संघावर विजय मिळवत श्रीलंकेने फायनलचं तिकिट काढलं. श्रीलंका संघ वन डे आणि टी-20 फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये सर्वात जास्त वेळा एन्ट्री करणारा संघ ठरला आहे. श्रीलंकेपाठोपाठ भारताने आणि त्यानंतर पाकिस्तान संघाने सर्वाधिकवेळा फायनलमध्येस प्रवेश केला आहे. श्रीलंकेने 12 वेळा, भारत 10, पाकिस्तान 5 आणि बांगलादेश संघाने 3 वेळा अंतिम फेरी गाठली आहे.

श्रीलंका संघाने 2022 साली आशिया कप जिंकला होता, पाकिस्तान संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्याआधी सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव करत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला होता.  भारताने सर्वाधिकवेळा आशिया कप जिंकला असला तरी फायनलमध्ये सर्वाधिकवेळा श्रीलंकेने बाजी मारली आहे.

पाक-श्रीलंका सामन्याचा धावता आढावा

पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना  252 धावा केल्या होत्या. स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान याने नाबाद 86 आणि अब्दुल्लाह शफीक 52 धावा केल्या होत्या. दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 250 चा टप्पा पार केलेला. फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या  श्रीलंका संघाची खडतर झालेली. समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी मजबूत  भागीदारी करत सामन्याचा संघाच्या पारड्यात झुकवला होता.  पाकिस्ताने शेवटला मुसंडी मारलेली पण असलंका याने मैदानावर तळ ठोकला होता. त्यानेच  मॅचविनिंग शॉट खेळला आणि संघाला विजय मिळवून दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.