Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी या संघाचं गणित फिस्कटलं, तर हा संघ आऊट

आशिया कप 2025 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे जात आहे. असं असताना सुपर 4 फेरीच्या शर्यतीतून एक संघ आऊट होणार हे आता निश्चित झालं आहे. तर एका संघाचं गणित नेट रनरेटमुळे फिस्कटलं आहे. अ गटातून भारत आणि पाकिस्तान हे संघ आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीसाठी प्रबळ दावेदार आहेत. चला जाणून घेऊयात गणित..

Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी या संघाचं गणित फिस्कटलं, तर हा संघ आऊट
Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी या संघाचं गणित फिस्कटलं, तर हा संघ आऊट
Image Credit source: ACC Twitter
| Updated on: Sep 13, 2025 | 6:53 PM

आशिया कप 2025 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर येत आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. साखळी फेरीतील हायव्होल्टेज सामना आता भारत पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट सुपर 4 फेरीत जागा निश्चित करेल. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचा या सामन्यात पराभव झाला तर ओमान आणि युएई या सामन्याकडे लक्ष असेल. हा सामना युएईने जिंकला तर पाकिस्तानचं गणित सहज सुटेल. पण ओमानने हा जिंकला तर पाकिस्तान आणि ओमानमध्ये चुरस असणार आहे. दुसरीकडे, सुपर 4 फेरीचं गणित पाहता चुकून पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाला तरी फार काही फरक पडणार नाही. कारण भारताने पहिल्याच सामन्यात युएईचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे भारताने शेवटच्या सामन्यात ओमानला पराभूत केलं तर भारताचं गणित जुळून जाईल. कारण भारताचा नेट रनरेट हा +10.483 इतका आहे. तर युएईचा नेट रनरेट हा -10.483 इतका आहे.

… नेट रनरेट पाहता युएईचं सुपर 4 चं स्वप्न भंगणार!

अ गटातून युएईला सुपर 4 फेरीत स्थान मिळवण्यासाठी काहीही करून दोन सामने जिंकावे लागतील. युएई आणि पाकिस्तानला पराभूत करावंच लागणार आहे. पण एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला तरी युएईचा पत्ता कापला जाईल. कारण युएईला पुढच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. जर जे शक्य झालं नाही तर नेट रनरेटचं गणित सुटणारच नाही. त्यामुळे या स्पर्धेतून बाद होण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

हाँगकाँग संघ स्पर्धेतून आऊट

दुसरीकडे, बांग्लादेश आणि हाँगकाँग यांच्यात या स्पर्धेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात हाँगकाँगचा पराभव सात विकेट्सनी पत्करावा लागला. हा आशिया कप 2025 मध्ये हाँगकाँगचा दुसरा सामना होता. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध 94 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. हाँगकाँग शून्य गुणांसह आणि -2.889 च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. प्रत्येक संघ गट टप्प्यात तीन सामने खेळतो आणि दोन सामने गमावल्यानंतर स्पर्धेतून आऊट होतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर पात्र होणार नाही हे निश्चित आहे.