
बहुप्रतिक्षित आशिय कप 2025 स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून झालीय. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग बी ग्रुपमधील 2 संघ होते. आता 10 सप्टेंबरला ए ग्रुपमधील पहिला आणि या स्पर्धेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात गतविजेता टीम इंडिया विरुद्ध यजमान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती आमनेसामने (UAE) असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना असणार आहे. सूर्यकुमार यादव याचा कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेतील हा पहिलाच सामना असणार आहे. तर मुहम्मद वसीम यजमान यूएईचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सामने टी 20 फॉर्मेटने होत आहेत. आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत जोरदार फटकेबाजी पाहायला मिळणार, यात काडीमात्र शंका नाही.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना बुधवारी 10 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजन 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सोनी लिव्ह एपवर मोफत सामना पाहता येणार नाही.
दरम्यान या आशिया कप स्पर्धेतून शुबमन गिल याचं टी 20I भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. तसेच शुबमनला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे ओपनिंगला कोण येणार? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन गेली अनेक महिने सातत्याने ओपनिंग करतोय. त्यामुळे शुबमनच्या एन्ट्रीनंतर संजूच्या स्थानात बदल केला जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर सामन्यादरम्यानच मिळेल.