IND vs PAK Final: टीम इंडियासमोर संकट! हे तीन खेळाडू जखमी, भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी मोठी अपडेट

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. तर या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. हे. हे तीन खेळाडू जखमी झाले आहेत.

IND vs PAK Final: टीम इंडियासमोर संकट! हे तीन खेळाडू जखमी, भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी मोठी अपडेट
भारत-पाकिस्तान अंतिम सामना
| Updated on: Sep 27, 2025 | 8:43 AM

Team India Injury Update : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या कपविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये यंदा कोणताही जल्लोष दिसला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारकडे सर्वांनीच हा सामना न खेळण्या्ची मागणी केली होती. पण याविषयीचा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप आहे. तर उद्या या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने(India-Pakistan Final Match) येतील. त्यापूर्वीच टीम इंडियाची चिंता वाढली आहे. कारण तीन खेळाडू जखमी झाले आहेत.

कोणते खेळाडू झाले जखमी?

अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा हे तीन खेळाडू जखमी झाल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिली. ऑलराऊंडर हार्दिक पंड्या हा श्रीलंका सामन्यात पहिले षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर पडला. अभिषेक शर्मा याच्या हाताचे दुखणे वाढले आहेत. तो ही या सामन्यावेळी मैदानाबाहेर पडला. तर तिलक वर्माला स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रास असह्य झाल्याची वार्ता समोर येत आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार यादव याने ही माहिती दिली. श्रीलंका सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना क्रॅम्प्सचा सामना करावा लागला. त्यांच्या स्नायूला दुखापत झाली अशी माहिती यादव याने दिली. पाकिस्तानविरोधातील अंतिम सामन्यापूर्वी ही स्नायू दुखापत बरी होईल अशी आशा त्याने व्यक्त केली. हे सर्व खेळाडू तंदुरुस्त होऊन पाकिस्तानविरोधात मैदानात उतरतील अशी त्याला आशा आहे.

गोलंदाज प्रशिक्षकांची माहिती काय?

भारत-श्रीलंका सामन्यानंतर भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या खेळाडूंच्या दुखापतीबाबत माहिती दिली. मॉर्केल यांच्या मते, या खेळाडूंना स्नायूची दुखापत झाली आहे. अभिषेक शर्मा या दुखापतीतून बाहेर आला आहे. तर हार्दिक पंड्या हा सध्या वैद्यकीय पथकाच्या निगराणी खाली आहे. अंतिम सामन्यापूर्वी तो पण बरा होण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता आहे. तिलक वर्मा हा तंदुरुस्त होईल की नाही याविषयीची माहिती मॉर्केल यांनी दिली नाही.

अंतिम सामन्यात तिघे दिसतील का?

या खेळाडूंना स्नायूची दुखापत झाली आहे. अभिषेक शर्मा त्यातून बाहेर आला आहे. तर पंड्या सुद्धा लवकर बरा होईल. पण तिलक वर्माविषयी अजूनही कोणतीही बाब समोर आलेली नाही. टीम इंडियाचे हे खेळाडू उद्या रविवारी, 28 सप्टेंबर 2025 पूर्वी मैदानात चमकदार कामगिरी बजावतील अशी आशा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us