आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट मिळणं कठीण, एंट्रीसाठी असा करावा लागेल जुगाड

भारत पाकिस्तान सामना मैदानात उपस्थित राहून पाहण्यासाठी अनेकांची इच्छा असते. या सामन्याचा प्रत्यक्ष मैदानातून अनुभव घेणं ही मोठी पर्वणी असते. आता दोन्ही संघ आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला भिडणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा पहिलाचा सामना आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व वाढलं आहे.

आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट मिळणं कठीण, एंट्रीसाठी असा करावा लागेल जुगाड
आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट मिळणं कठीण, एंट्रीसाठी असा करावा लागेल जुगाड
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 02, 2025 | 4:39 PM

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते भारत पाकिस्तान सामन्याचे.. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानबाबत प्रचंड चीड असणार आहे. भारतीय खेळाडू देखील त्याचा आवेशात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. असा हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी गर्दी होणार यात काही शंका नाही. या सामन्यापूर्वी तिकीट विक्री सुरु झाली आहे. पण तुम्हालाही हा सामना मैदानात उपस्थित राहून पाहायचा असेल तर एक अट आहे. तुम्हाला सहा आणखी तिकीटं खरेदी करावी लागतील. असं का ते पहिल्यांदा समजून घ्या. आशिया कप स्पर्धेची सर्व तिकीट Platinumlist.net विकली जात आहेत. यात दोन भाग केले आहेत. आबुधाबीत सिंगल तिकीट घेतलं जाऊ शकतं. पण दुबईत होणाऱ्या सामन्यासाठी तुम्हाला सात सामन्यांचे पॅकेज घ्याव लागेल. त्याची किंमत 3 लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे.

आशिया कप सामन्याच्या तिकीटाची किंमत

आशिया कप सामन्यांच्या तिकीटाची रक्कम ही 1247 रुपयांपासून सुरु होते. पण भारताच्या सामन्याच्या तिकीटाची किंमत जास्त आहे. भारत पाकिस्तान सामना हा दुबईत होणार आहे. तुम्हाला 35 हजार रुपयांपर्यंत किंमत असलेले संपूर्ण पॅकेज खरेदी करावे लागेल. इतके पैसे खर्च केल्यानंतर तुम्हाला दुबईत होणारे इतर सहा सामने पाहता येतील. या सामन्यांमध्ये तुम्ही भारत आणि युएई, सुपर फोरचे बी1 विरुद्ध बी2, ए1 विरुद्ध ए2, ए1 विरुद्ध बी1, ए2 विरुद्ध बी2 आणि अंतिम सामना पाहू शकता. या संपूर्ण पॅकेजमध्ये ग्रँड लाउंजची किंमत 73 हजार रुपयांपासून ते 3 लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे.

भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. उपकर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर असेल. भारतीय संघ या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला रवाना होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध असणार आहे. 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आणि 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध सामना होणार आहे.