AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याकडून चूक झाली…! विराट कोहलीबाबबत ‘त्या’ विधानानंतर माजी क्रिकेटपटूला उपरती

विराट कोहलीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भारताच्या माजी क्रिकेटपटूला पश्चाताप करण्याची वेळ आहे. टीव्ही माध्यमावर काही बोलण्यापूर्वी त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं, असंही त्याने सांगितलं. आता कुठे त्याला आपल्याकडून मोठी चूक झाल्याची उपरती झाली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

माझ्याकडून चूक झाली...! विराट कोहलीबाबबत 'त्या' विधानानंतर माजी क्रिकेटपटूला उपरती
माझ्याकडून चूक झाली...! विराट कोहलीबाबबत वादग्रस्त विधानानंतर माजी क्रिकेटपटूचा माफीनामाImage Credit source: PTI
| Updated on: Sep 02, 2025 | 4:00 PM
Share

विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्याला कारण ठरलं ते रॉबिन उथप्पा याने केलेलं वादग्रस्त वक्तव्य.. आता कुठे रॉबिन उथप्पाला त्या वक्तव्यावर पश्चाताप होत आहे. कारण त्या वक्तव्यामुळे विराट कोहलीसोबतचे संबंध ताणले गेले, असं रॉबिन उथप्पा यांचं म्हणणं आहे. जे काही बोललो, ते बोलण्यापूर्वी विराट कोहलीशी चर्चा करायला हवी होती, असंही रॉबिन उथप्पा याने सांगितलं. पण रॉबिन उथप्पाने विराट कोहलीसोबत कोणतीही चर्चा केली नाही. रॉबिन उथप्पाने केलेलं वक्तव्य 2019 वर्ल्डकप नंबर 4 पोझिशनवर होतं. हे वक्तव्य विराट कोहलीशी निगडीत केलं होतं. रॉबिन उथप्पाने हे वक्तव्य लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्यानंतर बराच वाद झाला होता. विराट कोहलीबाबत नॅशनल टीव्हीवर काही बोलण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा करायला होती. जर मी तसं केलं असतं तर आमचे चांगले असते, असं रॉबिन उथप्पा म्हणाला.

रॉबिन उथप्पा याने मुलाखतीत सांगितलं होतं की, विराट कोहलीला जर कोणी आवडत नाही तर तो त्याच्या नजरेत चांगलाही नसायचा. रायुडू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आवडणे आणि नापसंत करणे चुकीचे नाही. पण अंबाती रायुडूसारखे खेळाडू ज्यांना तुम्ही विश्वचषकाच्या जवळ आणता आणि नंतर काढून टाकता. हे काही बरोबर नाही. रायुडूकडे विश्वचषकासाठी कपडे होते. त्याच्याकडे त्याची किट बॅग होती. अशा परिस्थितीत तो विचार करत असेल की विश्वचषक खेळणार आहे. पण अचानक त्याला वगळण्यात आलं.

रॉबिन उथप्पाला आता आपल्या वक्तव्याची झळ बसली आहे. त्याने याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं. त्या वक्तव्यामुळे विराटसोबतच्या त्याच्या नात्यावर परिणाम झाला आहे. 2019 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानं माझा मित्र अंबाती रायुडूसोबत काय घडत होते ते मी पाहिले आणि समजले होते, पण विराटसोबत काहीच बोललो नव्हतो. मला त्याबाबत विराटशी बोलायला हवं होतं. हे त्याच्या नेतृत्वाचा नाही तर त्याच्या कर्णधारपदाचंही प्रकरण होतं. प्रत्येकाच्या कर्णधारपदाचा वेगळा अंदाज असतो. त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.