AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान सामना केव्हा?

Asia Cup 2025 IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. अखेर आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या भारत-पाकिस्तानचा सामना केव्हा?

Asia Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान सामना केव्हा?
IND vs PAK Asia CupImage Credit source: Getty Images
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 26, 2025 | 7:24 PM
Share

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं  वेळापत्रक समोर आलं आहे. आशिया कप स्पर्धेचा थरार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. मात्र त्यानंतरही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या स्पर्धेत दोन्ही संघ भिडणार आहेत. भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 सप्टेंबरला खेळवण्यात येऊ शकतो. यंदा टी 20i फॉर्मेटने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

यूएईमध्ये 20 दिवस रंगणार थरार

आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी 26 जुलैला सोशल मीडियाद्वारे आशिया कप स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या. नकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईत 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेतील संपूर्ण सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार, असं नक्वी यांनी म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संघात 14 सप्टेंबरला सामना होऊ शकतो. तसेच दोन्ही संघांचा या स्पर्धेत 3 वेळा आमनसामना होण्याची शक्यता आहे. तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघांचा लीग स्टेज आणि सुपर-4 च्या निमित्ताने किमान 2 वेळा आमनासामना होऊ शकतो.

एकूण 6 संघ भिडणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. आशिया कप 2023 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ सहभागी झाले होते.

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढला. पाकिस्ताननेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र भारतीय सैन्याने सर्व हल्ले परतवून लावले. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद केले आणि आर्थिक कोंडी केली. दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. त्यानंतर पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड 2025 स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यावर भारताच्या माजी खेळाडूंनी बहिष्कार घातला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान होणार की नाही? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?