
Asia Cup 2025 : पाकिस्तानविरोधात टीम इंडियात आज दोन मोठे बदल दिसतील. कर्णधार सूर्यकुमार यादव मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहे. आशिया कप 2025 मधील अंतिम सामना आज रविवारी, 28 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे. तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समरोसमोर येतील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. काय आहेत ते दोन मोठे बदल?
गट अ मध्ये भारतीय संघाने यापूर्वी शेजारी पाकिस्तानला 7 धावांनी लोळवले होते. त्यानंतर सुपरमधील सामन्यात सूर्यकुमार ब्रिगेडने पाकिस्तानी संघाला 6 गडी राखून पराभूत केले. आता भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी टीम इंडियाने संघात काही बदल केले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया कप 2025 वर नाव कोरण्यासाठी आसूसलेला आहे. त्यासाठी त्याने संघात दोन बदल केले आहे. तर तिकडे पाकिस्तानी संघ सुद्धा मागील दोन सामने उट्टे काढण्यासाठी सज्ज आहे.
It’s all about God’s plan 😇#TeamIndia‘s three musketeers talk about the Super Over and what it means for Arshdeep Singh to be the first to reach the milestone of 100 T20I wickets – by @RajalArora#AsiaCup2025 | #INDvSL | @arshdeepsinghh | @rinkusingh235
Watch 🔽 📹
— BCCI (@BCCI) September 27, 2025
या दोघांची संघात एंट्री
भारतीय संघात दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान धावपटू जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर शिवम दुबे आजच्या सामन्यात दिसण्याची दाट शक्यता आहे. बुमराह आणि दुबे या दोघांना श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता. जसप्रीत आणि शिवम यांना टीम इंडियाच्या प्लेईंग -11 मध्ये स्थान देण्यात येईल. तर हे दोघं संघात दाखल होत असल्याने वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांना अंतिम सामन्यात स्थान मिळणार नाही. हर्षित आणि अर्शदीप यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. तर स्नायुच्या दुखापतीमुळे मैदान सोडावा लागलेला अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या हे आज प्लेईंग 11 मध्ये खेळतील. या दोघांमुळे पाकिस्तानला नमवण्यासाठी प्लान आखणे सोपे होईल, असा अंदाज आहे.
अंतिम सामन्यातील संभाव्य भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह
अंतिम सामन्यातील संभाव्य पाकिस्तानी संघ : साहिबजादा फरहान, फखर जमां, सैम अयूब, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस, हुसैन तलत, मोहम्मम नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफरीदी, अबरार अहमद आणि हारिस रऊफ