
टीम इंडियाचा नवनियुक्त एकदिवसीय कर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा कमनशिबी ठरला आहे. शुबमनच्या विरोधात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे एडलेड ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पर्थनंतर एडलेडमध्येही ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन मिचेल मार्श याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाने विजयी सुरुवातीनंतरही दुसर्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत. जोश फिलिप, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन या तिघांच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एलेक्स कॅरी, झेव्हियर बार्टलेट आणि एडम झॅम्पा या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यनासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात होतं. मात्र कॅप्टन शुबमन गिल याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुबमनने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. सलामीच्या सामन्यातील पहिल्या डावात एकूण 5 वेळा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. दुसऱ्या डावात पाऊस गायबच झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मदत झाली. ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून डीएरआएसनुसार 131 धावांचं आव्हान पूर्ण करत मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे आता टीम इंडिया एडलेडमध्ये विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्यासह पहिल्या पराभवाची परतफेड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first in Adelaide.
Updates ▶ https://t.co/aB0YqSCClq#AUSvIND pic.twitter.com/G8vZXU7Yj8
— BCCI (@BCCI) October 23, 2025
भारतीय संघाचे 11 शिलेदार : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण? : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, मिचेल ओवेन, अॅडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड.