
टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 46.4 ओव्हरमध्ये 236 रन्सवर ऑलआऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमधील या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 53 धावांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाला शेवटचे 7 झटके दिले आणि 50 ओव्हरआधीच यशस्वीरित्या रोखलं. ऑस्ट्रेलियासाठी मॅट रेनशॉ याने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर टीम इंडियाच्या 6 च्या 6 गोलंदाजांनी विकेट घेतल्या. मात्र हर्षित राणा सर्वात यशस्वी ठरला. हर्षितने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडिया 237 धावा करत एकदिवसीय मालिकेचा शेवट विजयाने करणार की ऑस्ट्रेलिया सलग तिसरा सामना जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या ट्रेव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशीप केली. मोहम्मद सिराजने ही सेट जोडी फोडली. हेडने 29 धावा केल्या. त्यानंतर मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 27 रन्सची पार्टनरशीप केली. शॉर्ट 10 रन्सवर आऊट झाला. मॅथ्यू रेनशॉ आणि मॅथ्यू शॉर्ट या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट 30 धावांवर बाद झाला.
त्यानंतर मॅथ्यू रेनशॉ आणि एलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागदारी केली. या दरम्यान प्रसिध कृष्णाने याने कॅरीचा 8 धावांवर कॅच सोडला. त्यामुळे टीम इंडियाला ही जोडी चांगलीच महागात पडते की काय? अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र टीम इंडियाने कॅरीला आऊट करुन सामन्यात जोरदार कमबॅक केलं. भारताने ऑस्ट्रेलियाला 53 धावांच्या मोबदल्यात 7 झटके दिले आणि ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाची 183 आऊट 3 वरुन 236 ऑलआऊट अशी स्थिती झाली.
एलेक्स कॅरी याने 24 धावा केल्या. मॅथ्यू रेनशॉ याने 56 धावा केल्या. नॅथन एलिस याने 16 आणि कूपर कोनोली याने 23 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी हर्षित राणा याने 8.4 ओव्हरमध्ये 39 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स मिळवल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना आऊट केलं. तर मोहम्म्द सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.