AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कॅप्टन रोहित शर्माकडून कुणाला डच्चू? दोघांवर टांगती तलवार

Australia vs India 3rd Test : टीम इंडियाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित झालं आहे. टीम इंडियात कुणाला पुन्हा संधी मिळू शकते? जाणून घ्या.

AUS vs IND : प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कॅप्टन रोहित शर्माकडून कुणाला डच्चू? दोघांवर टांगती तलवार
rohit sharma aus vs ind
| Updated on: Dec 09, 2024 | 11:43 PM
Share

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सामन्यात 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. पर्थ कसोटीतील विजयी सुरुवातीनंतर टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियाला अ‍ॅडलेडमध्ये सलग दुसरा विजय मिळवून मालिकेवर घट्ट पकड मिळवण्याची संधी होती. मात्र यजमानांनी कमबॅक केल आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्यात यश मिळवलं. टीम इंडियाच्या काही जणांचा अपवाद वगळता बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांच्या कमबॅकमुळे दुसऱ्या कसोटीत 2 बदल केले गेले. तर वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी आर अश्विन याचा समावेश करण्यात आला. अशाप्रकारे 3 बदल केले गेल. मात्र हे बदल फार निर्णायक ठरले नाहीत. त्यामुळे कॅप्टन रोहित आता एक्शन मोडमध्ये आला आहे. रोहित तिसऱ्या सामन्यासाठी किमान 2 बदल करणार असल्याचं निश्चित आहे.

दोघांवर टांगती तलवार

उभयसंघातील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमधून आर अश्विन आणि हर्षित राणा या दोघांचा पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी दुसऱ्या कसोटीत निराशा केली. राणाने दुसऱ्या कसोटीत 16 षटकांत 86 धावा दिल्या. राणाला एकही विकेट घेता आली नाही. तर अश्विनला बॉलिंगने काही खास करता आलं नाही. अश्विनला फक्त 1 विकेटच घेता आली. तर अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 22 आणि 7 धावा केल्या.

कुणाला संधी?

हर्षित आणि अश्विन या दोघांच्या जागी आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी दिली जाऊ शकते. आकाशने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर वॉशिंग्टन बॉलिंगसह बॅटिंगही करतो.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश रेड्डी, वाशिंगटन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया