AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तो त्याचा…”, R Ashwin च्या निवृत्तीवर कॅप्टन रोहित शर्माची प्रतिक्रिया, पाहा व्हीडिओ

Rohit Sharma On R Ashwin Retirement : क्रिकेट चाहत्यांच्या ध्यानीमनी नसताना आर अश्विन याने डाव साधला आणि तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. कर्णधार रोहित शर्मा याने अश्विनच्या निवृत्तीबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

तो त्याचा..., R Ashwin च्या निवृत्तीवर कॅप्टन रोहित शर्माची प्रतिक्रिया, पाहा व्हीडिओ
Rohit Sharma and R Ashwin Press Conference
| Updated on: Dec 18, 2024 | 12:46 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. पाचव्या दिवसाच्या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांनी टीव्हीवर जी दृश्य पाहिली आणि जी शंका व्यक्त केली ती खरी ठरली. आर अश्विन विराट कोहली याच्यासोबत ड्रेसिंग रुममध्ये बोलताना भावूक झालेला पाहायला मिळाला. अश्विनने विराटला बोलता बोलता घट्ट मिठी मारली. अश्विनच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. अश्विनने त्यानंतर हेड कोच आणि माजी सहकारी गौतम गंभीर याच्यासह चर्चा केली. त्यानंतर अश्विनने बॉम्ब फोडला.

अश्विनने सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेला संबोधित केलं. अश्विनने आपण याच क्षणापासून निवृत्त होत असल्याचं तडकाफडकी जाहीर केलं आणि क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. अश्विन यानंतर निघून गेला. अश्विनच्या या निर्णयासह एका सुवर्ण युगाचा अंत झाला. अश्विनने अशाप्रकारे मालिकेदरम्यान निवृत्ती घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच अश्विनने या मालिकेनंतर निवृत्ती घ्यायला हवी होती, त्याने फार घाई केली, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं. टीम इंडियासाठी 13 वर्ष खेळणाऱ्या या ऑलराउंडरने चाहत्यांना निरोप देण्याचीही संधी दिली नसल्याचीही खंत व्यक्त केली जात आहे. अशात कर्णधार रोहितने अश्विनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.

रोहित शर्माने काय म्हटलं?

कॅप्टन रोहितने अश्विनच्या या निर्णयाचं स्वागत केलं. ” तो त्याचा (अश्विनचा) वैयक्तिक निर्णय आहे. त्याने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा”, असं रोहितने म्हटलं. तसेच अश्विनने आपल्याला आधीपासूनच निवृत्तीची माहिती दिल्याचं सांगितलेलं असंही रोहितने म्हटलं. “मी पर्थमध्ये आल्यानंतर आर अश्विनने निवृत्त होणार असल्याचं सांगितंल होतं”, असंही रोहितने पत्रकार परिषदेत म्हटलं.

सामन्यादरम्यानचा व्हीडिओ

अश्विनची निवृत्ती आणि रोहितची प्रतिक्रिया

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.

कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.