
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इतिहास रचला आहे. विराट कोहली झिरोवर आऊट झाल्यानंतर रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक बॅटिंग करत टीम इंडियाला जोरदार सुरुवात करुन दिली. रोहितने डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 1 चौकारासह एकूण 28 धावा केल्या. तर 1 धाव अतिरिक्त मिळाली. अशाप्रकारे 29 धावा मिळाल्या. त्यानंतर रोहितने चौथ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर सिक्स ठोकला. रोहितने या सिक्ससह इतिहास रचला आहे.
रोहित शर्माने टी20आय क्रिकेटच्या इतिहासात सिक्सचं द्विशतक पूर्ण केलं आहे. रोहित टी 20आय क्रिकेटमध्ये 200 सिक्स पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर आधीपासूनच टी20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. मात्र रोहितने 200 सिक्स पूर्ण करुन आपला विक्रम आणखी भक्कम केला आहे. तसेच रोहितने अवघ्या 19 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माचं हे त्याच्या कारकीर्दीतील वेगवान अर्धशतक ठरलं. तसंच रोहित टी 20 वर्ल्ड कप इतिहासात टीम इंडियासाठी वेगवान अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. हा विक्रम युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवराजने 2007 मध्ये 12 चेंडूत स्फोटक अर्धशतक झळकावलं होतं.
रोहित शर्मा – 200*
मार्टिन गुप्टील – 172
जॉस बटलर – 137
ग्लेन मॅक्सवेल – 133
निकोलस पूरन – 132
रोहितचं सिक्सचं द्विशतक
Milestone 🔓
Captain Rohit Sharma reaches 2️⃣0️⃣0️⃣ sixes in T20 Internationals 👏
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #TeamIndia | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/6LW6SJIky4
— BCCI (@BCCI) June 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.