AUS vs WI : विकेट घेतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने मारल्या भन्नाट उड्या, Watch Video

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिला कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडे 22 धावांची आघाडी असूनही ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. तर केविन सिंक्लेयरचं अनोखं सेलिब्रेशन चर्चेत राहिलं आहे.

AUS vs WI : विकेट घेतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने मारल्या भन्नाट उड्या, Watch Video
AUS vs WI : डेब्यु विकेट घेताच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने मारल्या कोलंटउड्या, अनोखं सेलिब्रेशन कॅमेऱ्यात चित्रित
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 26, 2024 | 6:15 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांचा कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकण्याचं मोठं आव्हान वेस्ट इंडिजसमोर आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने 311 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 289 धावांवर डाव घोषित केला. हातात एक विकेट असताना डाव घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेस्ट इंडिजला 22 धावांची आघाडी मिळाली. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा गोलंदाज केविन सिंक्लेयरच्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे. फिरकीपटू केविन सिंक्लेयरने आपली डेब्यू विकेट घेतल्यानंतर जोरदार उड्या मारल्या. या उड्या पाहून प्रत्येक जण आश्चर्याने पाहात राहिला. केविन सिंक्लेयरने उस्मान ख्वाजाची मोठी विकेट जाळ्यात अडकवली. त्यानंतर त्याने उड्या मारत सेलिब्रेशन केलं

उस्मान ख्वाजा 75 धावांवर खेळत होता. त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान होतं. त्यामुळे केविन सिंक्लेयरच्या हाती चेंडू सोपवला. त्याने हा निर्णय योग्य असल्याचं दाखवत ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याने उंच हवेत कोलांटउडी मारली. त्यामुळे समालोचकही आश्चर्यचकीत झाले. कारण इतकं जबरदस्त उड्या मारणं सोपं नाही.

केविन सिंक्लेयरने फिल्डिंग करताना एक जबरदस्त झेल पकडला होता. मार्नस लाबुशेनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. मार्नसला अवघ्या 3 धावांवर तंबूत परतावं लागलं. इतका जबरदस्त झेल घेतला की लाबुशेनलाही विश्वास बसला नाही. उजव्या हातावर हवेत उडी घेत त्याने झेल घेतला. वेस्ट इंडिजकडून वेगवान गोलंदाजांनी 7 गडी बाद केले. अल्झारी जोसेफने 4, केमार रोचने 3 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्मधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, अॅलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शामर जोसेफ