
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. अवघ्या काही दिवसांनंतर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एकूण 8 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. तसेच या संघात बदल करण्यासाठीही अवघे काही दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात बदल करावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागण्याची अधिक शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडू शकतो, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यामुळे संघात बदल करावा लागू शकतो. पॅटला घोट्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पॅट चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पूर्णपणे फिट होईल, याबाबत शक्यता फार कमी आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे हेड कोच अँड्रयू मॅक्डॉनल्ड यांनी दिली आहे. अँड्रयू मॅक्डॉनल्ड हे सध्या ऑस्ट्रेलिया टीमसह श्रीलंका दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. स्टीव्हन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करत आहे.
ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर श्राीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियासाठी श्रीलंकेविरुद्धची ही एकदिवसीय मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहे. मालिकेला 12 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. तर 14 फेब्रुवारीला मालिकेची सांगता होईल.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श याला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मिचेलला पाठीच्या त्रासामुळे या स्पर्धेला मुकावं लागलं आहे.
‘खत्म, टाटा, बाय-बाय, गया…
BAD NEWS FOR AUSTRALIA 📢
Pat Cummins & Josh Hazelwood set to be ruled out of the Champions Trophy 2025. [Code Cricket] pic.twitter.com/yTzgS4wI3p
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.