IND vs AUS: भारत दौरा सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, वाईट बातमी

IND vs AUS: भारतात येणारी फ्लाइट पकडण्याआधी ऑस्ट्रेलियन टीमसाठी वाईट बातमी आहे. निश्चितच भारतातील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ शकतो.

IND vs AUS: भारत दौरा सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, वाईट बातमी
Australian TeamImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 10:01 AM

सिडनी: ऑस्ट्रेलियाने आपल्या टेस्ट टीमची घोषणा केलीय. अजून दौरा सुरु झालेला नाही. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका बसलाय. भारतात येणारी फ्लाइट पकडण्याआधी ऑस्ट्रेलियन टीमसाठी वाईट बातमी आहे. निश्चितच भारतातील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यांच्या भारत दौऱ्याची खराब सुरुवात होऊ शकते. सुरुवात खराब झाली, तर मोहिम फत्ते होणं कठीण असतं. ऑस्ट्रेलिया संदर्भात जी वाईट बातमी आहे, ती वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या इंजरी संदर्भात आहे.

ऑस्ट्रेलियाला काय जिव्हारी लागलय?

टेस्ट सीरीजमधील मागच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2 वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धुळ चारलीय. त्याच पराभवाचा बदला घेणं हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असणार आहे. यात मिचेल स्टार्कची भूमिका महत्त्वाची आहे. पण सध्या तो इंजर्ड आहे.

पहिल्या टेस्टमध्ये हा प्रमुख प्लेयर का नाही खेळणार?

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार नाही, हे ऑस्ट्रेलियाकडून स्पष्ट करण्यात आलय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होईल. मिचेल स्टार्कच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. दिल्लीत दुसऱ्या कसोटीपासून खेळणार

मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मिचेल स्टार्कला दुखापत झाली होती. तो सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता. स्टार्क दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपासून टीमशी जोडला जाईल, असं ऑस्ट्रेलियन सिलेक्शन कमिटीने जाहीर केलय. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये कॅमरुन ग्रीन टीमसोबत असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज खेळताना ग्रीनला सुद्धा दुखापत झाली होती. त्यातून तो आता सावरलाय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.