AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नला कोरोनाची बाधा, इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ‘द 100’ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव

वॉर्न याची प्रकृती रविवारी सकाळी बिधडल्यनंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर अहवाल पॉजिटिव्ह आला. शेनसोबत संघातील सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची बाधा झाली आहे.

मोठी बातमी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नला कोरोनाची बाधा, इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 'द 100' स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव
शेन वॉर्न
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 11:16 AM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळेच तो रविवारी साउदर्न ब्रेव यांच्या विरुद्धच्या सामन्यातही त्याचा संघ लंडन स्प्रिट्ससोबत दिसला नाही. शेन वॉर्न लंडन स्प्रिट्स मेन्स संघाचा हेड कोच आहे. वॉर्नची प्रकृती रविवारी सकाळी बिघडल्यानंतर त्याची टेस्ट करण्यात आली. ज्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. अहवाल आल्यानंतर वॉर्नला त्वरीत संपूर्ण संघापासून दूर विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

शेन वॉर्न शिवाय लंडन स्प्रिट्स संघातील अजून एका सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्याला देखील विलगीकरणात ठेवले आहे. सुदैवाने प्रशिक्षक शेन आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतरही संघातील कोणत्याच खेळाडूला कोरोनाची बाधा अद्याप झालेली नाही.

शेन वॉर्नशिवाय संघ मैदानात

साउदर्न ब्रेव विरुद्धच्या सामन्यात लंडन स्प्रिट्सचा संघ लॉर्ड्सवर प्रशिक्षक शेन वॉर्नशिवाय सामना खेळण्यासाठी उतरला. या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. आधी खेळताना 100 चेंडूच्या सामन्यात साउदर्न ब्रेव संघाने 6 विकेट देत 145 रन केले. साउदर्न ब्रेवकडून ऐलेक्स डेविसने 40 चेंडूत 50 धावा केल्यां. त्यानंतर लंडन स्प्रिट्स संघाला 100 चेंडूत 146 धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर जोसने 43 चेंडूत  55 धावा केल्या. पण नंतर कोणत्याच खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने लंडन स्प्रिट्सचा संघ 4 धावांच्या अंतराने पराभूत झाला. लंडन स्प्रिट्सने 100 चेंडूत 7 विकेट्सच्या बदल्यात 141 धावाच केल्या.

(Australian Formar cricketer shane warne tests positive for covid 19)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.