Video: कांगारुंची तऱ्हाच न्यारी, विश्वविजेते झाले आणि चक्क बुटात पेय टाकून प्यायले, फुल्ल टू सेलिब्रेशन

| Updated on: Nov 15, 2021 | 8:05 AM

बहुचर्चित असा टी20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठा जल्लोष केला, ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर त्यांनी हटके पद्धतीने आपला विजय साजरा केला.

Video: कांगारुंची तऱ्हाच न्यारी, विश्वविजेते झाले आणि चक्क बुटात पेय टाकून प्यायले, फुल्ल टू सेलिब्रेशन
Follow us on

T20 World Cup 2021: बहुचर्चित असा टी20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला, मात्र फलंदाजांनी ही कसर भरून काढली. फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषक जिंकला आहे. दरम्यान विश्वचषक पटकवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला हा विजय साजरा केला आहे. त्यांनी विजयानंतर आपल्या बुटामध्ये पाणी आणि इतर पेय टाकून ते प्रशासन केले आहे.

…म्हणून पिले बूटामधून पाणी

खरतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ही जगातील सर्वात मजबूत टीम म्हणून ओळखली जाते, कसोटी आणि वनडेमध्ये त्यांची कामगिरी नेहमीच दमदार राहिली आहे. मात्र त्यांना आतापर्यंत टी20 विश्वचषक जिंकता आता नव्हता, रविवारी झालेली फायनल मॅच जिंकून हा विक्रमही संघाने आपल्या नावावर केला आहे. विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. खेळाडूंनी आपल्या पायातील बूट काढत त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पिले. यातून त्यांनी आम्ही टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी जी मेहनत घेतली ती फळाला आल्याचा संदेश दिला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.

केनची एकाकी झुंज

सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजी निवडली. जो निर्णय़ ऑसीसच्या गोलंदाजांनी अगदी बरोबर असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या गप्टीलने धिम्यागतीने धावा करत 28 रन केले. पण केनने संपूर्ण डाव सांभाळत 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजावा खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे न्यूझीलंड 172 धावा करु शकला.

मार्श-वॉर्नर जोडीची कमाल

त्यानंतर न्यूझीलंडने ठेवलेलं 173 धावांच आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहजच पार केलं. पण कर्णधार फिंच 5 धावा बाद करुन झाल्यावर यावेळी खऱ्या अर्थाने अनुभवी वॉर्नरने मार्श सोबत डाव सांभाळला. वॉर्नर आणि मार्शने केवळ 35 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 82 रन केले. आय़पीएलमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या वॉर्नरने अंतिम सामन्यात मात्र अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने नेलं. सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर सर्वाधिक धावा मिशेल मार्शने केल्या. त्याने 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना खिशात घातला आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले.

 

 

संबंधित बातम्या

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

T20 World Cup 2021: क्रिकेट जगताला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, असा आहे आतापर्यंतच्या विजेत्यांचा इतिहास

T20 WC सेमीफायनलमध्ये हरलेला पाकिस्तानी संघ दुबईहून रवाना, मात्र मायदेशी परतला नाही!