AUSW vs INDW: भारताने ऑस्ट्रेलियाला केलं पराभूत, धावांचा पाठलाग करताना 21 धावांनी कसे जिंकले?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 21 धावांनी जिंकला. या सामन्यात 133 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दिलं होतं. पण 50 धावा करताच भारताला 21 धावांनी विजय मिळाला.

AUSW vs INDW: भारताने ऑस्ट्रेलियाला केलं पराभूत, धावांचा पाठलाग करताना 21 धावांनी कसे जिंकले?
AUSW vs INDW: भारताने ऑस्ट्रेलियाला केलं पराभूत, धावांचा पाठलाग करताना 21 धावांनी कसे जिंकले?
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Feb 15, 2026 | 5:24 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनीत पार पडला. नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 18 षटकात सर्व गडी गमवून 133 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 134 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान गाठण्यासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने दमदार सुरुवात केली. अवघ्या 25 चेंडूत 33 धावांची खेळी केली. शफाली वर्मा 11 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 21 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स मैदानात आली आणि 6 चेंडूत 17 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी जमली असताना सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पळापळ झाली. पाऊस थांबण्याची वाट पाहिली गेली.

पाऊस काही थांबला आणि सामना रद्द करण्यात आला. पाच षटकांचा खेळ झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला गेला. भारताला 21 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. खरं तर भारताने 50 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 14.5 षटकात 83 धावांची गरज होती. 89 चेंडूत 83 धावा आवश्यक होता. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 5.1 षटकात केलेल्या आक्रमक खेळीचा फायदा झाला. भारतीय संघ 21 धावांनी पुढे होते. ऑस्ट्रेलियाने 5.1 षटकात 2 गडी गमवून तेव्हा 34 धावा केल्या होत्या. पण 134 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत गुणांकन करून भारताला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यातील विजयानंतर भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, गोलंदाजीत भारताने चांगली कामगिरी केली. भारताकडून सहा गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पण अरुंधती रेड्डी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात 22 धावा देत 4 गडी बाद केले. तर रेणुका सिंह ठाकुरने 4 षटकात 14 धावा देत 2 गडी, तर श्री चरणीने 3 षटकात 14 धावा देत 2 गडी टिपले. त्याचबरोबर क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने दोन पैकी एक सामना जिंकला मालिका खिशात घालेल. भारताचा पुढचा सामना 19 फेब्रुवारील होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.