IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची कर्णधाराच्या नावाची घोषणा; केएल राहुल नव्हे, ‘या’ खेळाडूच्या हाती संघाची सूत्रे
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 व्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधार नेमला आहे. केएल राहुलच्या नावाची चर्चा असतानाही, फ्रँचायझीने अक्षर पटेलवर विश्वास ठेवला आहे. अक्षरने टी20 क्रिकेटमध्ये बडोदाचे नेतृत्व केले आहे आणि त्याचा IPL मध्ये देखील चांगला अनुभव आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)चा पुढचा सीजन सुरु व्हायला अजून एक आठवडा बाकी आहे. आयपीएल 2025च्या आधीच एक मोठी बातमी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल असेल अशी चर्चा होती. पण ही चर्चा मावळली आहे. ऑलराऊंडर अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे जाईल असा अंदाज होता. तशी चर्चाही सुरू होती. कारण राहुलला दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल2025च्या (IPL 2025 ) लिलावात 14 कोटीला खरेदी केलं होतं. पण असं असूनही फ्रेंचाईजने अक्षर पटेलवर अधिक भरवसा टाकला आहे. अक्षरने टी20 क्रिकेटमध्ये एकून 16 टी20 सामन्यात बडोदाचं नेतृत्व केलं आहे. त्यात त्याने 10 सामन्यात विजय मिळवला आहे.
अक्षरने गेल्या आयपीएलच्या सीजनमध्ये एन. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा दिल्ली 47 धावांनी पराभूत झाली होती. टी20चा कर्णधार म्हणून अक्षरने 36.40च्या सरासरीने 364 धावा कुटल्या आहेत. यावेळी 57 धावा त्याचा बेस्ट स्कोअर राहिला आहे. गेल्या वर्षीच त्याने आरसीबीच्या विरोधात 57 धावा केल्या होत्या. टी20मध्ये कर्णधार म्हणून अक्षरने 29.07च्या सरासरीने 13 विकेट घेतले होते.
मी तयार आहे…
कर्णधार पदाची धुरा हाती आल्यानंतर अक्षरने मीडियाशी संवाद साधला. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणं माझ्यासाठी हा सन्मान आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी टीमच्या सर्व सदस्यांचा आणि सहकाऱ्यांचा आभारी आहे, असं अक्षरने म्हटलं आहे. तसेच टीमचं नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे, असंही त्याने स्पष्ट केलंय.
दिल्ली कॅपिटल्स टीम
अक्षर पटेल (कप्तान), कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, जेक फ्रेजर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डु प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नालकंडे, विप्रज निगम, दुष्मंथा चमीरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मानवंत कुमार, त्रिपुराना विजय, माधव तिवारी.
IPL 2025च्या सर्व संघाचे कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स (CSK) – ऋतुराज गायकवाड
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) – ऋषभ पंत
राजस्थान रॉयल्स (RR) – संजू सॅमसन
सनराइजर्स हैदराबाद (SRH) – पॅट कमिंस
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) – रजत पाटीदार
पंजाब किंग्स (PBKS) – श्रेयस अय्यर
मुंबई इंडियंस (MI) – हार्दिक पंड्या
कोलकाता नाइट राइडर्स (KKR) – अजिंक्य रहाणे
गुजरात टायटन्स (GT) – शुभमन गिल
दिल्ली कॅपिटल्स (DC) – अक्षर पटेल