बाबर आझम पास, शाहीन आफ्रिदी फेल! सराव सामन्यातील एका षटकात असं रंगलं द्वंद्व

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी पाकिस्तानने एक सराव सामना खेळला. या सामन्यात बाबर आझमचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला.

बाबर आझम पास, शाहीन आफ्रिदी फेल! सराव सामन्यातील एका षटकात असं रंगलं द्वंद्व
बाबर आझम पास, शाहीन आफ्रिदी फेल! सराव सामन्यातील एका षटकात असं रंगलं द्वंद्व
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 27, 2026 | 4:50 PM

पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळणार का? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण पाकिस्तानने टी20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात बाबर आझमला स्थान दिलं आहे. त्यामुळे बाबर आझमला पुन्हा एकदा लय सापडल्याचं दिसत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारीपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. ही टी20 मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यासाठी बाबर आझमला आपल्या फलंदाजीला धार काढत आहे. बाबर आझम नुकताच बिग बॅश लीग स्पर्धा खेळून आला आहे. मात्र त्याची कामगिरी लीगमध्ये काही चांगली नव्हती. त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. असं सर्व असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाने सराव सामना खेळला. या सामन्यात बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आमनेसामने आले होते.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सराव सामना खेळला गेला. या सामन्यात बाबर आझम शाहीन शाह आफ्रिदीवर तुटून पडला. त्याने त्याला 2 षटकार आणि 2 चौकार मारले. यासह एका षटकात 21 धावा काढल्या. बाबर आझमने या सामन्यात 45 चेंडूंचा सामना केला आणि आक्रमकपणे 78 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 150च्या वर होता. त्यामुळे बिग बॅश लीगमध्ये खेळल्यानंतर बाबर आझममध्ये फरक दिसून आला आहे. कारण बीबीएलमधील 11 सामन्यात फक्त 202 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 104 देखील नव्हता. बाबर आझमने खराब स्ट्राईक रेटसह 200हून अधिक धावा केल्याचा ठपका बसला आहे.

बाबर आझम आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियात जे काही घडलं ते तिथेच ठेवून आला आहे. आता बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पाकिस्तानचे सर्व श्रीलंकेत होणार आहे. 7 फेब्रुवारीला पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडशी होणार आहे. 10 फेब्रुवारीला अमेरिका आणि 15 फेब्रुवारीला भारताशी लढत होणार आहे. 18 फेब्रुवारीला नामिबियाशी लढत होईल.