
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अ गटात भारतासोबत पाकिस्तानचा संघ आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला आहे. मागच्या काही दिवसात पाकिस्तानी संघात बरीच उलथापालथ झाली. पण सरतेशेवटी शाहीन आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून पुन्हा बाबर आझमकडे सोपवण्यात आलं. पण त्याच्या नेतृत्वातही काही चांगली कामगिरी होताना दिसत नाही. आयर्लंडने मालिकेत चांगलाच दम काढला. त्यानंतर इंग्लंडने व्हाईट वॉश दिल्याने पाकिस्तानचं मनोबळ पडलं आहे. असं असताना खेळाडूंना प्रोत्साहान देण्याऐवजी बाबर आझम त्यांचा अपमान करण्यात वेळ घालवत आहे. बाबर आझमने सराव दरम्यान आपल्या संघ सहकाऱ्याची तुलना थेट प्राण्यासोबत केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तानी क्रीडाप्रेमी या व्हिडीओखाली आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सराव दरम्यान पाकिस्तानचे खेळाडू रग्बी खेळताना दिसले. व्हिडीओच्या सुरुवातीलाच बाबर आझम हा आझम खानला गेंडा बोलताना दिसत आहे. त्यानंतर सर्वच खेळाडू हसू लागतात.
या व्हिडीओत पाकिस्तानचे 7-8 खेळाडू दिसत आहेत. या खेळाडूंना बॉल पकडायचा होता. जेव्हा सर्व खेळाडू सज्ज होतात तेव्हा आझम खान वेगळ्याच दुनियेत दिसतो. तेव्हा बाबर आझम आपल्या युवी खेळाडूकडे बोट दाखवत म्हणतो की, हा गेंडा अजून सरळ झालेला नाही. बाबर आझमने केलेल्या वक्तव्याला बॉडी शेमिंग किंवा फॅट शेमिंग म्हंटलं जातं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता लोकं बाबर आझमला ट्रोल करत आहेत.
Babar Azam calling "Ay gainda nai siddha hoya" to Azam Khan .
What if he says "Chal be Zimbu" to Babar Azam?#T20WorldCup pic.twitter.com/aNNBO6hkGk
— Sir BoiesX (@BoiesX45) June 3, 2024
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 6 जूनला होणार आहे. यजमान अमेरिकेसोबत ही लढत होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार इथपासून कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याची खलबतं सुरु आहेत.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.