AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs WI : वेस्ट इंडिज बांगलादेशला मालिका विजयापासून रोखणार? दुसरा सामना कोण जिंकणार?

Bangladesh vs West Indies 2nd ODI Live Streaming : यजमान बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली. त्यामुळे विंडीजसाठी दुसरा सामना हा 'करो या मरो' असा आहे.

BAN vs WI : वेस्ट इंडिज बांगलादेशला मालिका विजयापासून रोखणार? दुसरा सामना कोण जिंकणार?
Bangladesh vs West Indies 2nd ODI PreviewImage Credit source: @windiescricket
| Updated on: Oct 20, 2025 | 9:35 PM
Share

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. यजमान बांगलादेशने विंडीजला एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शनिवारी 18 ऑक्टोबरला 74 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे बांगलादेशला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्यामुळे बांगलादेश सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसर्‍या बाजूला विंडीजसमोर मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे विंडीजसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे.

मेहदी मिराज दुसर्‍या सामन्यात बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्याकडे विंडीजच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना केव्हा?

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना मंगळवारी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना कुठे?

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे होणार आहे.

बांगलादेश-विंडीज दुसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश-विंडीज दुसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश-विंडीज दुसरा सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड

बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 48 सामने खेळवण्यात आले आहेत. या 48 पैकी काही सामन्यांचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत राहिल्याचं आकड्यांवर स्पष्ट होतं.

वेस्ट इंडिजने बांगलादेश विरुद्ध 48 पैकी सर्वाधिक 24 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 22 सामन्यांमध्ये विंडीजवर पलटवार केला आहे. तर उभयसंघातील 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.

बांगलादेशने असा जिंकला सामना

बांगलादेशने पहिल्या सामन्यात विंडीजसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विंडीजला 150 पार मजल मारता आली नाही. बांगलादेशने विंडीजला 39 ओव्हरमध्ये 133 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 74 धावांनी सामना जिंकला. आता विंडीज मंगळवारी या पराभवाची परतफेड करणार की बांगलादेश मालिका जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश