कैसा हिरो बनेगा रे…! झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, Watch Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी असलेल्या 20 संघांचा जोरदार सराव सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. टी20 वर्ल्डकपसाठी झिम्बाब्वेचा संघ पात्र ठरलेला नाही. मात्र पाच सामन्याच्या टी20 मालिकेत हासं करून बसला आहे. काय झालं ते व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

कैसा हिरो बनेगा रे...! झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, Watch Video
Image Credit source: Twitter
| Updated on: May 11, 2024 | 4:10 PM

टी20 स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघासाठी आयपीएल स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. दुसरीकडे, इतर देशांनी टी20 मालिकांचं आयोजन करून स्पर्धेसाठी तयारी केली आहे. पाकिस्तानचा संघ तयारीसाठी आयर्लंडला गेला आहे. तर झिम्बाब्वेचा संघ पाच सामन्याच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश झिम्बाब्वे हा देखील या स्पर्धेच्या तयारीचा भाग आहे. झिम्बाब्वे टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. मात्र बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतही स्वत:चं हासं करून ठेवलं आहे. या मालिकेत 4 सामने पार पडले असून बांगलादेशने 4-0 ने आघाडी घेतली आहे. अर्थातच झिम्बाब्वेने ही मालिका गमावली आहे. या मालिकेतील चौथा सामन्यात झिम्बाब्वेने क्षेत्ररक्षणात माती खाल्ली. झिम्बाब्वेने क्षेत्ररक्षणात पाकिस्तान संघाची आठवण करून दिली. कारण हातातला सोपा रनआऊट गमावून बसला. असं कसं काय होऊ शकतं असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पाकिस्तानचा संघही खराब फिल्डिंगसाठी प्रसिद्ध आहे. सोपे झेल आणि गचाळ क्षेत्ररक्षण करून अनेकदा याचं पाकिस्तानने दर्शन घडवलं आहे. आता तोच कित्ता झिम्बाब्वेने गिरवला आहे.

झिम्बाब्वेने नाणेफेकीच कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारत बांगलादेशला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बांगलादेशचा संघ आपल्या डावातील शेवटचं षटक खेळत होती. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तनवीर इस्लामने सिंगल घेण्यासाठी धाव घेतली. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या मुस्तफिझुर रहमान त्याचा विसंवाद झाला आणि रनआऊटची संधी मिळाली. मात्र ही संधी ब्लेसिंग मुजारबनीने गमावली. चेंडू स्टम्पवर लागला नाही आणि विकेटकीपरही अडवू शकला नाही. इथपर्यंत सर्व ठीक होतं. मिस फिल्ड झाल्यानंतर तनवीरने पुन्हा धावा घेतली.

दुसरी धाव घेण्यासाठी मुस्तफिझुर तयार नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा रनआऊटची स्थिती तयार झाली. यावेळी मुस्तफिझुर खूपच अडचणीत आला होता. कारण अर्ध पिच धावत नाही तोच खेळाडूच्या हातात चेंडू पोहोचला होता. त्यामुळे त्याने वाचण्याचा अपेक्षा सोडल्या होत्या. पण इथेही झिम्बाब्वे माती खाल्ली. आणि हातातला चेंडू स्टम्पला लावण्याऐवजी मारला आणि रनआऊट गमवला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झिम्बाब्वेने पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. चौथ्या सामन्यात बांगलादेशने 144 धावांच लक्ष्य झिम्बाब्वेसमोर ठेवलं होतं. मात्र बांगलादेशचा संघ 138 धावा करू शकला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4, मुस्तफिझुर रहमानने 3 आणि तस्किन अहमदने 2 गडी बाद केले. तर जोनाथन कॅम्पबेल सर्वाधिक 31 धावा करू शकला.