
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट टीमची भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीला हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे घ्यावा लागला आहे. बांगलादेशने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यासाठी नकार दिला होता. आयसीसीने सोबतच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाचा समावेश केला आहे. मात्र आयसीसीला बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर का करावं लागलं? त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला, खेळाडूंना आणि भारताला किती आर्थिक नुकसान होणार? हे आपण जाणून घेऊयात. मुस्तफिजुर रहमान याची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून हकालपट्टी करण्यात आली. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर मुस्तफिजुर याची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी तीव्र मागणी करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने दिलेल्या आदेशानुसार केकेआर फ्रँचायजीने मुस्तफिजुरला रिलीज केलं. इथूनच या वादाला तोंड फुटलं. मुस्तफिजुरला रिलीज केल्याने बीसीबीला (Bangladesh Cricket Board) भारतात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आठवला....