
Bangladesh Player Mustafizur Rahman: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि भारतातील आणि बांगलादेशातील त्याचे समर्थक सध्या उर बडवताना दिसत आहेत. पण हा मुस्तफिजुर काही क्रिकेटमधील आदर्श खेळाडू अथवा देव नाही. त्याचे कारनामे पाहिले तर त्याला IPL मधून बाहेरचा रस्ता दाखवला हे योग्यच झालं असं तुम्हालाही वाटेल. सध्या बांग्लादेश हा धार्मिक कट्टरतावाद्यांच्या हातातील बाहुलं झाला आहे. इथं हिंदूंवर अन्वनीत अत्याचार होत आहेत. भारतात त्याविरोधात मोठे आंदोलन झाले. काळजीवाहू सरकार या हल्ल्यांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने धडा शिकवण्यासाठी बांगलादेशी खेळाडूंना भारतात खेळू न देण्याची मागणी झाली आणि त्यात मुस्तफिजुर रहमानची विकेट पडली. मुस्तफिजुरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण हे भारताविरोधात 2015 मद्ये झाले होते. त्यावेळी त्याचे कारनामे पाहिले तर तुमचाही संताप अनावर होईल आणि जे त्याच्यासाठी सध्या आसवं गाळत आहेत, त्यांची कीव येईल.
रोहित शर्मासोबत कुरबूर
जून 2015 मध्ये जेव्हा भारतीय संघ बांगालदेशाच्या दौऱ्यावर होता. तेव्हा पहिल्याच एकदिवशीय सामन्यात मुस्तफिजुर रहमान हा वारंवार भारतीय खेळाडूंना त्रास देत होता. रोहित शर्मा फलंदाजी करण्यासाठी उतरल्यावर त्याने मुद्दाम धावपट्टीवर येत रोहितला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. रोहितने त्याला दोनदा इशारा दिला. त्याला समजावले, पण काडीबाज मुस्तफिजुर बधला नाही.
कॅप्टन कूल मुस्तफिजुरवर रागावला
रोहित शर्माने थोडा संयम बाळगला. पण कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी जेव्हा सलामीला आला तेव्हा मोठं नाट्य घडलं. मुस्तफिजुर वारंवार धावपट्टी उभा राहत असल्याचे धोनीच्या लक्षात आले. तो धावा काढताना अचानक मध्यभागी येत असल्याने धोनी त्याच्यावर चिडला. 25 व्या षटकात जेव्हा धोनी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा मुस्तफिजुर अचानक मध्यभागी आला आणि त्याने धोनीला अडवण्याचा प्रयत्न केला. मग धोनी त्याच्यावर चांगलाच चिडला. धोनीचं असं सहजासहजी करत नाही. पण धोनीने त्याला धक्का दिला. ही ठोस इतकी जबरदस्त होती की मुस्तफिजुरला मैदानच सोडावं लागलं. त्याला चांगलाच मार लागला.
याप्रकरणी दोन्ही खेळाडूंना आयसीसीने दंड ठोठावला. सामन्याच्या शुल्कातून धोनीला 75% आणि मुस्तफिजुरला 50% दंड भरावा लागला. याप्रकरणी अनेक दिग्गज खेळाडूंनी मुस्तफिजुरवर ताशेरे ओढले. पदार्पणातच असे गैरवर्तन खेळाडू कसा करू शकतो असा सवाल विचारल्या जाऊ लागला. तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डावरही अनेक विश्लेषकांनी ताशेरे ओढले. खेळ भावना न जोपासता गल्ली क्रिकेटसारख्या या मुस्तफिजुरच्या कृतीने अनेकांचं डोकं तापलं.