AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : बारबडोसच्या ‘पीच नंबर 4’ वर पहिल्यांदाच भारत खेळणार, याआधी दोन सामन्यांचा निकाल काय?

IND vs SA : बारबाडोसच्या पीच नंबर 4 वर आज भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये फायनल सामना होणार आहे. या पीचवर आधी नामीबिया विरुद्ध ओमान आणि स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड सामना झालाय. या दोन सामन्यांचा निकाल काय लागला? ते जाणून घ्या.

IND vs SA : बारबडोसच्या ‘पीच नंबर 4’ वर पहिल्यांदाच भारत खेळणार, याआधी दोन सामन्यांचा निकाल काय?
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Jun 29, 2024 | 3:53 PM
Share

बारबाडोसच्या पीच नंबर 4 वर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलचा सामना होणार आहे. बारबाडोसची ही विकेट पूर्णपणे वेगळी आहे. टीम इंडियाने बारबाडोसमध्येच सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला हरवलं होतं. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पीच नंबर 4 वर दोन सामने झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा एकही सामना या पीचवर झालेला नाही. बारबाडोसचा पीच दोन्ही टीम्ससाठी एक नवीन कोड असणार आहे. त्यासाठी दोन्ही टीम्सना पीचच्या गरजेनुसार प्लेइंग इलेव्हन निवडावी लागेल.

पीच पाहून फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? सुपर-8 पासून सेमीफायनल पर्यंत कॅप्टन रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनला हात लावलेला नाही. म्हणजे काही बदल केला नाही. 3 स्पेशलिस्ट स्पिनर आणि दोन वेगवान गोलंदाज हे टीम इंडिया कॉम्बिनेशन राहीलय. फायनल एक मोठी मॅच असून पीचही नवीन आहे. टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी बारबाडोसच्या पीच नंबर 4 वर झालेल्या दोन सामन्यांबद्दल जाणून घेऊया.

पीच नंबर 4 वर झालेल्या दोन सामन्यांचा रेकॉर्ड काय?

बारबाडोसच्या ज्या पीच नंबर 4 वर फायनल होणार आहे, तिथे आधी नामीबिया विरुद्ध ओमान आणि स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड सामना झालाय. नामीबिया विरुद्ध ओमान सामन्यात 11 विकेट वेगवान गोलंदाज आणि 5 विकेट स्पिनर्सनी काढले. सामन्याचा शेवटही रोमांचक झालाय. स्कोर लेवल झाल्यानंतर मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. यात नामीबियाने विजय मिळवला होता. स्कॉटलंड आणि इंग्लंडमधील पीच नंबर 4 वरचा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. पावसाने या सामन्यावर पाणी फिरवलं होतं. पावसाने व्यत्यय आणण्याआधी या मॅचमध्ये स्कॉटलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 10 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 90 धावा केल्या होत्या.

काय वाटतं टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन बदलेल का?

बारबाडोसच्या पीच नंबर 4 वर बॅट आणि बॉलमध्ये चांगली लढत पहायला मिळू शकते. कारण या पीचवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना मदत मिळते. पीचवरुन असं वाटत नाही की, टीम इंडिया फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन बदलेल. म्हणजे सुपर-8 पासूनचाच संघ कायम राहील.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.