AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या हट्टापुढे BCCI ने टेकले हात, बोर्डाचा नियमात मोठा बदल, इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट

rules change for vaibhav suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या बालहट्टापुढे BCCI ने हात टेकले. क्रिकेट बोर्डाने इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यापूर्वी नियमात मोठा बदल केला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे अपडेट?

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या हट्टापुढे BCCI ने टेकले हात, बोर्डाचा नियमात मोठा बदल, इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट
वैभव सूर्यवंशी
| Updated on: Jun 18, 2026 | 5:04 PM
Share

Vaibhav Suryavanshi Parents with him on England Tour: श्रीलंकेत वैभव सूर्यवंशी समोरच्या संघाला भिडला. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अलर्ट झाले. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या भूमिकेने बोर्डाला एक धडा मिळाला. आता इंग्लंड आणि आर्यलंड संघाच्या दौऱ्यादरम्यान वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही त्याच्यासोबत असतील. त्याची पहिल्यांदा भारतीय T20 टीमसाठी निवड झाली आहे. 26 जून रोजी बेलफास्टमध्ये सामने सुरू होतील. वैभव एकूण 7 सामन्यात खेळेल. त्यातील दोन आयर्लंडविरोधात तर पाच हे इंग्लंड संघाविरोधात असतील. सर्वच देशांच्या संघात 14 वा 15 वर्षांचा खेळाडू नसतो. अनेक दशकानंतर वैभव सूर्यवंशीसारखा खेळाडू कमी वयात मैदानावर आला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर यांनी 16 व्या वर्षी पदार्पण केले होते. जेव्हा किशोरवयीन मुलगा ज्येष्ठ संघात खेळतो तेव्हा काही अडचणी येतात असे BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली.

वैभवचे आई-वडीलही असतील सोबत

देवजीत सैकिया यांनी सांगितले की, वैभवला अधिक मोकळं वाटावं आणि त्याच्या मनावरील भार हलका करण्यासाठी, दडपण कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्याचे आई-वडील सोबत असल्याने वैभवला येणारी अडचण दूर होईल असे व्यवस्थापनाला वाटते. जेव्हा एखादा मुलगा शाळेच्या सहलीवर जातो. तेव्हा त्याच्यासोबत शिक्षक अथवा त्याच्या आई-वडीलांनाही सोबत नेले जाते. वैभवसोबत त्याचे पालक असतील.

वैभव हा अजून लहान आहे. तो बहुधा शाळेच्या अखेरच्या वर्षात असेल. त्यामुळे व्यवस्थापनाला वाटते की, या दौऱ्यावेळी त्याचे आई-वडीलही सोबत असावेत. त्याचे पालक वैभवची काळजी घेतील. कारण वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटसाठी पुढील दोन ते तीन दशकांसाठी एक संपत्ती आहे, असे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले.

वैभव सूर्यवंशीविरोधात नाही कारवाई

वैभव सूर्यवंशीविरोधात बीसीसीआय कोणताही कारवाई करणार नाही. वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ए टीमचा खेळाडू विशेन हलंबगे यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. श्रीलंकन खेळाडूंनी चिथावणीखोर टिप्पणी केल्याने सूर्यवंशीने हलंबगे याला धक्का दिला होता. त्यानंतर बीसीसीआय वैभव सूर्यवंशीविरोधात मोठी कारवाई करेल असे सोशल मीडियावर वारंवार दावे करण्यात येत होते. पण देवजीत सैकिया यांनी कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. ही घटना मैदानावर घडली आहे. मॅच रेफरी आणि अम्पायर या निर्णायक व्यक्ती तिथे उपस्थित असताना बीसीसीआय या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे सैकिया यांनी स्पष्ट केले. जे काही झाले ते खेळाचाच एक भाग होता. BCCI ची त्यात काहीच भूमिका नाही. जर काही चुकीचं झालं असेल तर अम्पायर आणि रेफरी त्यावर निर्णय घेतील, असे सैकिया यांनी स्पष्ट केले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी