AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Chief Selector : टीम इंडियाच्या मुख्य निवड समितीपदी वीरेंद्र सेहवागची निवड? वीरूने स्पष्टच सांगितलं!

वीरेंद्र सेहवागची निवड समितीच्या मुख्यपदी निवड झाल्याची जोरदार चर्चा आहे. थेट भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डने सेहवागला या पदासाठी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत स्वत: वीरूने खुलासा केला आहे.

BCCI Chief Selector : टीम इंडियाच्या मुख्य निवड समितीपदी वीरेंद्र सेहवागची निवड? वीरूने स्पष्टच सांगितलं!
virender sehwag Image Credit source: PTI
| Updated on: Jun 23, 2023 | 10:56 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेटसाठी गेली काही वर्ष चांगली गेलेली नाहीत. अशातच फेब्रुवारी महिन्यात एका स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर पद रिकामं झालं असून सध्या शिवसुंदर दास हे चीफ सिलेक्टरची भूमिका बजावत आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड नव्या चीफ सिलेक्टरच्या शोधात असून रोज नवनवीन नावे समोर येत आहे.

भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) ने उत्तर भारतातून भारतीय क्रिकेट टीमसाठी सिलेक्टर पदाचे अर्ज मागवले आहे. या भागातून ज्याची निवड होईल, त्याची चीफ सिलेक्टर पदावर वर्णी लागू शकते. या भागातून क्रिकेट विश्व गाजवणारे गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, आणि युवराज सिंह हे खेळाडू येतात.

या खेळाडूंमधील वीरेंद्र सेहवाग सोडून कोणीही या पदासाठी योग्य नसल्याने सेहवागच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डने वीरेंद्र सेहवागला या पदासाठी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. मात्र वीरेंद्र सेहवागने स्वतः यावर खुलासा करत अशी कोणतीही ऑफर आली नसल्याचं सांगितलं आहे.

चीफ सिलेक्टर होण्यासाठी असतात ‘या’ अटी

असा खेळाडू ज्याने 30 फर्स्ट क्लास मॅच खेळले आहेत. ज्या खेळाडूने 7 पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळले आहेत. 10 वनडे मॅच किंवा 5 वर्षांआधी निवृत्त झालेला आहे. BCCI च्या कोणत्याही कमेटीची सदस्य नसला पाहिजे. चीफ सिलेक्टर झाल्यावर 5 वर्ष पदावर कार्यरत राहण्याची तयारी असावी.

चीफ सिलेक्टरला वर्षाला असतं इतकं मानधन

भारतीय क्रिकेट संघाच्या चीफ सिलेक्टरला वर्षाला 1 कोटी रुपये इतके मानधन मिळतं. तर चीफ सिलेक्टर कमिटीतील इतर 4 सदस्यांना 90 लाख रुपये मानधन मिळतं. सध्या निवड समितीत 4 सदस्य आहेत. शिव सुंदर दास (ईस्ट), सुब्रतो बॅनर्जी (मध्य), सलिल अंकोला (पश्चिम) आणि एस शरथ (दक्षिण) हे 4 सदस्य सध्या समितीत आहेत. शिव सुंदर दास सध्या चीफ सिलेक्टरच्या भूमिकेत आहेत.

वीरेंद्र सेहवागची कारकिर्द

वीरेंद्र सेहवागने 104 टेस्ट मध्ये 8586 धावा केल्या असून त्यामध्ये 23 शतकांचा समावेश आहे. सेहवागचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोर 319 रन इतका आहे. सेहवागने 251 वनडे मॅच खेळले आहेत. ज्यात 8273 रन त्याच्या नावावर असून 15 शतकं आणि 38 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.