
बीसीसीआयने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट रुपडं पालटलं आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा वैभव प्राप्त झालं आहे. दिग्गज खेळाडू देखील स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा बदल बीसीसीआयने केला आहे. हा निर्णय देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धांसाठी असणार आहे. बीसीसीआय वनडे क्रिकेटचा फॉर्मेट बदलणार आहे. आता देशांतर्गत वनडे स्पर्धेत तु्म्हाला प्लेट ग्रुप सिस्टम पाहायला मिळेल. या नव्या पर्वापासून हा बदल लागू होणार आहे. या नियमाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार ठआहे. पहिला सामना नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन, दुसरा सामना सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनमध्ये होईल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफी असो की वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धा, अंडर 23 पुरुष राज्य ए ट्रॉफी वनडे स्पर्धा असो.. या स्पर्धेतील सर्व चार संघ चार एलिट आणि एक प्लेट गटात विभागले जातील. तळातील सहा संघ प्लेट गटात असतील. यापूर्वी प्रत्येक पर्वात प्लेट गटातील दोन संघ वर जायचे. तर दोन संघ खाली यायचे. त्यानंतर एक संघाला वर किंवा खाली जायचा. या बदलाच्या माध्यमातून देशांतर्गत क्रिकेट आणखी भक्कम करण्याचा हेतू बीसीसीआयचा आहे. यामुळे प्रत्येक संघाची पारख होईल. तसेच चांगल्या खेळाडूंची निवड करणं सोपं होईल.
From key changes 📋 to format updates 🔄 to new grouping formats 🗂️
Here are the key highlights ✨ of the 2025-26 domestic season 🏏@IDFCFIRSTBank pic.twitter.com/T2P5zDxsl5
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 22, 2025
टीम इंडिया 2026 या वर्षात काही महत्त्वाचे वनडे सामने खेळणार आहे. या निर्णयामुळे काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते.या आधी बीसीसीआयने रणजी स्पर्धेत एलीट आणि प्लेट ग्रुप फॉर्मेटमध्ये सामने खेळवण्याचा निर्णय घेतला होता. रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धा याच फॉर्मेटमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेची सुरुवात ऑक्टोबरपासून होणार आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी20 स्पर्धेतही बीसीसीआयने बदल केला आहे. येथे बाद फेरीऐवजी सुपर लीग स्टेज आणण्याचा निर्णय घेतला आहे.