अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी (2 जानेवारी) ह्रदयविकाराचा झटका आला होता.

अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह
सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 6:39 AM

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly Heart Attack) शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे काल संध्याकाळी त्याच्यावर अॅंजियोप्लास्टी (angioplasty) करण्यात आली आहे. गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे, परंतु पुढील चार-पाच दिवस रुग्णालयातच उपचार घेणार आहे. (Sourav Ganguly’s condition stable after Angioplasty, Corona report Negative)

सौरव काल सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, तसेच त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यनंतर त्याला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टर आणि सौरवच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या पत्नीला मदतीचे आश्वासन दिलं आहे.

गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटद्वारे गांगुलीच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

राजकीय घडामोडीमुळे ‘दादा’ टेन्शनमध्ये?

गांगुली गेल्या काही महिन्यांपासून कोलकातामध्येच आहे. गांगुलीने काही दिवसांआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. यानंतर गांगुलीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपशी वाढती जवळीक पाहून मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीला दिलेला भूखंड परत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गांगुलीला सौम्य झटका आला का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.

(BCCI president Sourav Ganguly Health status, successful angioplasty after heart attack and Corona report Negative)

संबंधित बातम्या :

Sourav Ganguly | बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची 135 दिवसात तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना टेस्ट

सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.