AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World cup 2023 | पाकिस्तानच्या वर्ल्ड कप तयारीला झटका, शेवटच्या क्षणी बिघडला प्लान

ODI World cup 2023 | वर्ल्ड कप आधी पाकिस्तानचा एक प्लान बिघडलाय. पाकिस्तानी टीमला आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तयारीच्या दृष्टीने पाकिस्तानी टीमने रणनिती आखली होती.

ODI World cup 2023 | पाकिस्तानच्या वर्ल्ड कप तयारीला झटका, शेवटच्या क्षणी बिघडला प्लान
हा खेळाडू पाकिस्तान संघाचा असून त्याचा पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश होतो.Image Credit source: AFP
| Updated on: Sep 23, 2023 | 11:42 AM
Share

लाहोर : पाकिस्तानी सिलेक्टर्सनी शुक्रवारी आपल्या वर्ल्ड कप टीमची घोषणा केली. आशिया कप स्पर्धेत सुपर-4 मध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानच सगळं लक्ष आता 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपवर असणार आहे. भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाच्या तयारीसाठी पाकिस्तानने प्लान बनवलाय. पण त्या सगळ्या प्लानवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची टीम आता कुठलीही सीरीज खेळणार नाहीय. भारतात वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी पाकिस्तानी टीमला काही दिवस दुबईला थांबायच होतं. पण खेळाडूंच्या व्हिसामध्ये प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे त्यांचा हा प्लान कॅन्सल होऊ शकतो.

पाकिस्तानी टीम पुढच्या आठवड्यात यूएईला रवान होणार होती. टीम काही दिवस तिथे थांबून नंतर हैदराबादला जाणार होती. तिथेच पाकिस्तान पहिला सराव सामना खेळणार आहे. 29 सप्टेंबरला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानी टीम सराव सामना खेळणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने हे वृत्त दिलय. पाकिस्तानी टीम आता पुढच्या आठवड्यात बुधवारी लाहोरहून दुबईला रवाना होईल. तिथून हैदराबादला जाणार आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 9 टीम्सपैकी पाकिस्तान अशी एकमेव टीम आहे, ज्यांना अजून व्हिसा मिळालेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय पातळीवर चांगले संबंध नाहीयत. त्यामुळे दोन्ही देशात येणं-जाणं खूप कठीण आहे. पाकिस्तानी टीम शेवटची भारतात कधी आलेली?

पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून क्रिकेट मालिका बंद आहेत. दोन्ही देश परस्परांचे दौरे करत नाहीत. फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीम आमने-सामने येतात. दोन्ही देशांणध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्तानी टीमने भारताचा दौरा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी टीम फक्त एकदाच भारतात आली आहे. 2016 आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात आली होती. टीम इंडियाने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. यामुळे आशिया कपचे बहुतांश सामने श्रीलंकेत खेळवावे लागले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.