IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मॅच आधी पत्रकाराचा तो प्रश्न राहुल द्रविड यांना नाही आवडला, सरळ म्हणाले…
IND vs AFG : T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत-अफगानिस्तानची टीम पहिल्यांदा आमने-सामने येणार आहे. बारबाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी हेड कोच राहुल द्रविड कॅप्टन रोहित शर्मासोबत मिळून प्लानिंग करत आहेत. या मॅचआधी एक प्रेस कॉन्फ्रेंस झाली. या दरम्यान तिथे असं काहीतरी घडलं, की ज्यामुळे राहुल द्रविड नाराज झाले.

T20 वर्ल्ड कप संपताच टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. ते टीमची साथ सोडतील. पण त्याआधी त्यांना टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवायच आहे. म्हणून टीमच्या खेळाडूंसोबत त्यांचा जोरदार सराव सुरु आहे. खेळाडूंच कौशल्य ते टीमची प्लानिंग या सर्व बाजूंवर द्रविड टीमसोबत काम करतायत. बारबाडोसमध्ये टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध सुपर-8 चा पहिला सामना खेळणार आहे. कॅप्टन रोहित शर्मासोबत मिळून ते अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यासाठी रणनिती तयार करतायत. या दरम्यान भारतीय संघाबाबतच्या एका प्रश्नावर ते नाराज झाले.
राहुल द्रविड यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. टीम इंडियाने त्या टुर्नामेंटमध्ये सर्व टीम्सना धूळ चारली होती. एकही सामना न गमावता फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. पण फायनलच्या दिवशी थोडी गडबड झाली. भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे सर्व फॅन्स मन मोडलं. त्याच्या आठवणी आजही भारतीयांच्या स्मरणात ताज्या आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यााआधी मीडियाशी बोलताना एका रिपोर्टरने टीम इंडियाचा असाच एक पराभव झाला होता, त्याची आठवण करुन दिली, त्यावर द्रविड नाराज झाले.
द्रविड यांचं रोखठोक उत्तर
1997 साली बारबाडोसच्या मैदानात टीम इंडियाचा एका कसोटी सामन्यात पराभव झाला होता. द्रविड यांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, ‘त्यांच्याकडे इथल्या काही चांगल्या आठवणी सुद्धा आहेत’ तुम्ही नव्या आठवणी बनवणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “मी इथे काही बनवायला आलेलो नाही. जुन्या आठवणींच दडपण ठेवत नाही असं सांगितलं. जे झालं, ते मागे सोडून नव्या गोष्टींसाठी मेहनत घेतो. सगळ लक्ष वर्तमानावर असतं. 1997 साली जे झालं, तो चिंतेचा विषय नाही. 1997 मध्ये जे झालं, त्याने अफगाणिस्तान विरुद्धचा रिझल्ट बदलणार नाहीय. म्हणून टीम इंडियाच लक्ष फक्त सुपर-8 च्या सामन्यावर आहे”
बारबाडोसच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड काय?
T20 वर्ल्ड कपमध्ये बारबाडोसच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड फार चांगला नाहीय. टीम इंडियाने येथे दोन सामने खेळलेत, दोन्हीमध्ये पराभव झालाय. 2010 साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. आता 14 वर्षानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध इथे खेळणार आहे.
