AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या 4 महिने आधी मोठी भविष्यवाणी, ‘या’ दोन टीम्समध्ये होणार फायनल

World Cup 2023 : प्रसिद्ध क्रिकेटपटूने कुठल्या दोन टीम्स फायनलमध्ये पोहोचणार, त्या बद्दल भविष्य वर्तवल आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात रंगणार आहे. 10 टीम्या या वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत.

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या 4 महिने आधी मोठी भविष्यवाणी, 'या' दोन टीम्समध्ये होणार फायनल
odi world cup 2023
| Updated on: Jun 14, 2023 | 2:04 PM
Share

नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस चालणार असून भारतात होणार आहे. तीन नॉकआऊट सामन्यांसह एकूण 48 मॅच वर्ल्ड कपमध्ये खेळल्या जाणार आहेत. यावेळी वर्ल्ड कपमध्ये 10 टीम्स खेळताना दिसणार आहेत. वनडे वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर होणं अजून बाकी आहे. पण पाकिस्तान क्रिकेट टीमच्या माजी कॅप्टनने आधीच भविष्यवाणी केली आहे. फायनल कोण खेळणार? त्या दोन टीमची नावं त्याने सांगितली आहेत.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि माजी सिलेक्टर मिस्बाह उल हकने वनडे वर्ल्ड कपबद्दल भविष्यवाणी केली आहे. मिस्बाह उल हकने फायनल कुठल्या दोन टीम्समध्ये होणार, ते सांगितलय.

क्वालिफायर गटातून 2 जागांसाठी किती टीम खेळणार?

वनडे वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबरला होणार आहे. फायनल सामना 19 नोव्हेंबरला खेळला जाईल. टीम इंडिया आपले 9 सामने 9 वेगवेगळ्या वेन्युवर खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑक्टोबरला लढत होईल. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही मॅच होईल. भारत, इंग्लंड, पाकिस्तान, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमने रँकिंगच्या हिशोबाने वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलय. झिम्बाब्वेमध्ये 18 जून ते 9 जुलै दरम्यान क्वालिफायर इवेंट होईल. यात 10 टीम्स वर्ल्ड कप 2023 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खेळतील. फक्त दोन टीम्सना संधी मिळेल. त्याचा परफॉर्मन्स कसा आहे?

भारत-पाकिस्तान दरम्यान फायनल सामना पाहायला मिळू शकतो, अशी मिस्बाह उल हकने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते पाकिस्तानकडे वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली संधी आहे. मिस्बाह उल हकने वर्ष 2015 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीमच नेतृत्व केलं. 2001 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून डेब्यु केला होता. वर्ष 2017 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मिस्बाहने पाकिस्तानकडून खेळताना 75 टेस्ट मॅचमध्ये 5222 धावा, 162 वनडेत 5122 रन्स आणि 39 टी 20सामन्यात 788 धावा केल्या.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.