AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे दोन मोठे निर्णय, इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत केलं असं की…

आयपीएल 2023 स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर ही रणनिती चांगलीच गाजली होती. बीसीसीआयच्या या नियमांमुळे भल्याभल्यांची रणनिती फेल गेली होती. अखेर बीसीसीआयने या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे दोन मोठे निर्णय, इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत केलं असं की...
टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी सर्व खेळाडू खूप मेहनत घेत असतात. मात्र यामधील काहींचं हे फक्त स्वप्नच राहून जातं. तर काही शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडत नाहीत आणि आपलं लक्ष्य गाठल्यावरच ते थांबतात. महिला भारतीय संघामध्ये एका आदिवासी पाड्यामधील एका खेळाडू टीम इंडियाकडून खेळत आहे.
| Updated on: Jul 07, 2023 | 5:05 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर्समुळे संपूर्ण सामन्याचं चित्र बदलल्याचं पाहिलं गेलं आहे. अगदी मोक्याची क्षणी इम्पॅक्ट प्लेयर एन्ट्री मारत सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकायचा. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका किती महत्त्वाचं आहे ते आयपीएल स्पर्धेत अधोरेखित झालं होतं. या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियम सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुर होणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू होणार

इम्पॅक्ट प्लेयर नियम तसं पाहिलं तर मागच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत लागू होता. पण तेव्हा 14 वं षटक संपण्यापूर्वी खेळायची अनुमती आणि टॉसआधी त्यांची नावं देणं अनिवार्य होतं. आता आयपीएलप्रमाणे सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत चार पर्याय असतील त्यापैकी एका खेळाडूची निवड करता येणार आहे. “दोन्ही संघांना फक्त एकच इम्पॅक्ट प्लेयर खेळवण्याची अनुमती असेल. पण खेळवणं बंधनकारक नसेल.”, असं बीसीसीआयने आपल्या नियमावलीत सांगितलं आहे.

अष्टपैलू खेळाडूंचं होणार नुकसान!

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होणार अशी चर्चा रंगली आहे. कारण गरजेच्या वेळी फलंदाज किंवा गोलंदाज आपली भूमिका बजावून जाऊ शकतो. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंची जागा आता इम्पॅक्ट प्लेयर घेईल.

एशियन गेम्स स्पर्धा खेळण्यास मंजुरी

दुसरीकडे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हांगझोउ एशियन गेम्स स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघांना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही स्पर्धा यापूर्वी 2014 मध्ये इंचियोन येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेत भारताने सहभाग नोंदवला नव्हता. यावेळी वनडे वर्ल्ड कप 2023 आणि एशियन गेम्स एकत्र असल्याने दोन्ही संघ वेगवेगळे असतील. वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि एशियन कपसाठी शिखर धवन याच्या नेतृत्वात संघ खेळेल, अशी चर्चा आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.