Video : बेन स्टोक्सचा धमाका, एका ओवरमध्ये 34 धावा, तब्बल 17 षटकार ठोकले, पाहा खास व्हिडीओ

| Updated on: May 06, 2022 | 9:11 PM

डावाच्या एका टप्प्यावर तो 8 चेंडूत 46 धावा करत होता. अलीकडेच पूर्णवेळ इंग्लिश कसोटी कर्णधार म्हणून घोषित झाल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्टोक्सचा हा पहिला डाव होता.

Video : बेन स्टोक्सचा धमाका, एका ओवरमध्ये 34 धावा, तब्बल 17 षटकार ठोकले, पाहा खास व्हिडीओ
ben stokes
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : इंग्लंडच्या कसोटी सामन्याचा कर्णधार बेन स्टोक्स (ben stokes) गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींनी त्रस्त आहे. यामुळे त्याला देशांतर्गत स्पर्धेत परतण्यास उशीर झाला होता. मात्र, आज त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Cricket) अनेक विक्रम रचले आहेत. थोडा थांबला पण आल्यावर जोरदार विक्रम केले. स्टोक्सनं 88 चेंडूत 161 धावा केल्या. यामध्ये त्याने 18 वर्षीय डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज जोश बेकर (Josh Baker) विरुद्ध 5 षटकार आणि 1 चौकार मारत 34 धावा केल्या. बेन स्टोक्सनं 161 धावांच्या खेळीत 17 षटकार ठोकले. कौंटी (County Cricket) चॅम्पियनशिप सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याची ही संख्या आहे. त्याने अँड्र्यू सायमंड्स आणि ग्रॅहम नेपियर यांचा विक्रम मोडलाय. स्टोक्सच्या आधी फक्त इतर 4 खेळाडूंनी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एका षटकात 5 षटकार मारले होते. स्टोक्सचे शतक हे डरहमचे सर्वात वेगवान शतक ठरले आहेत. बेकरविरुद्धच्या षटकातील पाचव्या षटकाराने त्याने आपले शतक पूर्ण केले आणि  कौतुकास पात्र ठरला. सध्या जगभारत स्टोक्सचीच चर्चा सुरू आहे.

पाहा स्टोक्सनं ठोकलेली एका षटकात 5 षटकारे

एका षटकात 5 षटकार

स्टोक्सच्या खेळीची एक गोष्ट म्हणजे तो दुखापतीनंतर खेळताना दिसत नव्हता. डावाच्या एका टप्प्यावर तो 8 चेंडूत 46 धावा करत होता. अलीकडेच पूर्णवेळ इंग्लिश कसोटी कर्णधार म्हणून घोषित झाल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्टोक्सचा हा पहिला डाव होता. यापूर्वी स्टोक्सने वेस्ट इंडिजच्या विनाशकारी दौऱ्यानंतर आयपीएल मेगा लिलावातून माघार घेतली होती. कारण त्याला खेळाच्या दीर्घ स्वरूपावर लक्ष केंद्रित करायचे होते. स्टोक्सने या मालिकेत यापूर्वी केलेल्या कामगिरीपेक्षा सर्वाधिक षटके टाकली. त्याच्या या खेळीमुळे त्याला उन्हाळ्यात खूप आत्मविश्वास मिळेल कारण तो भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध इंग्लंड संघाचे नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला तयार करतो.

कर्णधार बेन स्टोक्स

88 चेंडूत 161 धावा

स्टोक्सनं 88 चेंडूत 161 धावा केल्या. यामध्ये त्याने 18 वर्षीय डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज जोश बेकर विरुद्ध 5 षटकार आणि 1 चौकार मारत 34 धावा केल्या. बेन स्टोक्सनं 161 धावांच्या खेळीत 17 षटकार ठोकले. कौंटी चॅम्पियनशिप सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याची ही संख्या आहे. त्याने अँड्र्यू सायमंड्स आणि ग्रॅहम नेपियर यांचा विक्रम मोडलाय. स्टोक्सच्या आधी फक्त इतर 4 खेळाडूंनी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एका षटकात 5 षटकार मारले होते.