AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL ची प्रगती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डोळे दिपले, BBL साठी मोठी घोषणा

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने क्रिकेट जगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील क्रिकेपटूंना या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. त्याचं मुख्य कारण आहे, आयपीएलमध्ये मिळणारा पैसा.

IPL ची प्रगती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डोळे दिपले, BBL साठी मोठी घोषणा
Image Credit source: ipl
| Updated on: Jun 22, 2022 | 5:26 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने क्रिकेट जगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील क्रिकेपटूंना या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. त्याचं मुख्य कारण आहे, आयपीएलमध्ये मिळणारा पैसा. BCCI ने काही दिवसांपूर्वी IPL Media Rights ची तब्बल 48,390 कोटींना विक्री केली. बीसीसीआयने इतक्या विक्रमी किमतीला मीडिया राइट्स विकून क्रिकेट विश्वाला आपली आर्थिक ताकत दाखवून दिली. आयपीएलची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता पाहून आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डही बीसीसीआयच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बिग बॅश लीगचं (BBL) आयोजन केलं जातं. बिग बॅश लीग मध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या धर्तीवर ड्राफ्ट सिस्टिम सुरु करण्याची बुधवारी घोषणा केली. आयपीएलच्या प्रगतीने अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डांचे डोळे दिपून गेले आहेत. बांगलादेश, पाकिस्तानात सुद्धा आयपीएलच्या धर्तीवर लीग स्पर्धा होतात. पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएल इतका पैसा मिळत नाही, हे खुलं वास्तव आहे.

डिसेंबरमध्ये बीबीएलचा पुढचा सीजन

BBL चा पुढचा सीजन डिसेंबर मध्ये सुरु होणार आहे. त्यासाठी पुढच्या काही महिन्यात ड्राफ्ट तयार होईल. ड्राफ्ट सिस्टिमतंर्गत प्रत्येक टीमला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 खेळाडूंची निवड करता येईल. परदेशी खेळाडूंना आकर्षिक करण्याच्या दृष्टीने ड्राफ्ट सिस्टिम बनवण्यात येईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बीबीएलचं मुल्य वाढवणं, हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा उद्देश आहे. ड्राफ्ट मध्ये खेळाडूंच्या 4 कॅटेगरी असतील. पहिली प्लॅटिनम, दुसरी गोल्ड, तिसरी सिल्वर आणि चौथी ब्राँझ. प्लॅटिन कॅटेगरीतल्या क्रिकेटर्सना जास्त पैसा मिळेल. आयपीएल प्रति सामना किंमतीच्या आधारावर जगातील दुसरी महागडी लीग आहे. पैशांच्या बाबतीत आयपीएलने फुटबॉलमधील लोकप्रिय इंग्लिश प्रीमियर लीगलाही मागे टाकलं आहे.

उनमुक्त चांद BBL मध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू

भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कॅप्टन उनमुक्त चांद यावर्षी बीबीएलमध्ये खेळला होता. मेलबर्न रेनेगेड्सकडून डेब्यु करुन त्याने इतिहास रचला. उनमुक्त या लीगमध्ये खेळलेला पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. मागच्यावर्षी त्याने भारतीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने परदेशात क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.