Video : पैज लावून सांगतो अशी विकेट कोणीही पाहिली नसेल, व्हिडोओ होतोय व्हायरल
एक फलंदाज विचित्रपद्धतीने आऊट झाला आहे. त्याचं नशीब फुटकं म्हणावं लागेल आणि बॉलरची तर काय लॉटरीच लागली. कोणालाही काही समजलं नाही सुरूवातीला मात्र जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र बॅट्समन नाराज झालेला दिसला.

मुंबई : क्रिकेटमध्ये कधी कसा सामना फिरेल काही सांगता येत नाही. अनेकदा तर फिल्डर असा काही करिष्मा करतात की एका कॅचने संपूर्ण सामना पालटवून टाकतात. अशा कॅचचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक फलंदाज विचित्रपद्धतीने आऊट झाला आहे. त्याचं नशीब फुटकं म्हणावं लागेल आणि बॉलरची तर काय लॉटरीच लागली. कोणालाही काही समजलं नाही सुरूवातीला मात्र जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र बॅट्समन नाराज झालेला दिसला.
पाहा व्हिडीओ-:
Just when you thought you’d seen it all! Caught in the keeper’s helmet! 🪖🤣#EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/CbkNoM8txy
— European Cricket (@EuropeanCricket) September 19, 2023
व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आसं असेल की घडलं काय होतं? युरोपियन लीगमधील हा सामना असून त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाने राडा केला होता. त्याने गोलंदाजांची मजबूत धुलाई केली होती, अवघ्या 16 चेंडूत त्याने 40 धावा केल्या होत्या. गडी काही थांबायचं नाव घेत नव्हता मात्र तो दिवसच त्याचा नव्हता. कारण तो ज्या पद्धतीने आऊट झाला आहे ते पाहून तसंच वाटेल.
स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाने चेंडू जोरात मारण्याच्या प्रयत्नात बॅटती कट लागली आणि कीपरच्या ना हातात ना दुसरा कुठे चेंडू थेट हेल्मेटच्या जाळीमध्ये अडकून बसला. आधी कोणालाच काही समजलं नाही मात्र जेव्हा सर्व काही लक्षात आलं तेव्हा सर्वज हसू लागले. खास करून ज्याने हा सुपरकॅच घेतलेल्या कीपरलाही हसू आवरलं नाही.
दरम्यान, क्रिकेट जगतात या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना पैज लावून सांगतो की अशा विकेटचा व्हिडीओ पाहिला नसेल.