AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : टुर्नामेंटमध्ये Kavya Maran च्या टीमला झटका, मोठा खेळाडू स्पर्धेतून OUT

IPL 2023 : तीन दिवसापूर्वीच त्याने बॅट आणि बॉलची कमाल दाखवून प्रतिस्पर्धी टीमची वाट लावलेली. त्याला सूर गवसल्याने फ्रेंचायजीच टेन्शन कमी झालं होतं. पण त्याच्या बाहेर होण्याने मोठा धक्का बसलाय.

IPL 2023 : टुर्नामेंटमध्ये Kavya Maran च्या टीमला झटका, मोठा खेळाडू स्पर्धेतून OUT
Kavya maran
| Updated on: Apr 27, 2023 | 12:53 PM
Share

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद टीमचा संघर्ष सुरु आहे. या दरम्यान त्यांना एक झटका लागला आहे. 3 दिवसापूर्वी बॅट आणि बॉलने धुमाकूळ घालणारा एक मोठा प्लेयर आयपीएल 2023 मधून आऊट झालाय. हैदराबादने गुरुवारी 8.75 कोटी रुपये मुल्य असलेला हा खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्याची पुष्टी केली. या खेळाडूला हॅमस्ट्रिंगची दुखापत झालीय. फ्रेंचायजीने टि्वट करुन ही माहिती दिली.,

हैदराबाद टीमचा संघर्ष सुरु आहे. 7 पैकी आतापर्यंत 2 सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय. एकूण 4 पॉइंट्ससह हैदराबादची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर आहे. SRH टीममधून बाहेर गेलेल्या खेळाडूच नाव आहे, वॉशिंग्टन सुंदर. मागच्याच सामन्यात त्याला सूर गवसला होता.

हैदराबादची टीम पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर?

हैदराबादच्या टीमचा लीगमध्ये संघर्ष सुरु आहे. 7 पैकी फक्त 2 सामन्यात त्यांना विजय मिळालाय. एकूण 4 पॉइंट्ससह हैदराबादची टीम 9 व्या स्थानावर आहे. सुंदर मागच्याच सामन्यात फॉर्ममध्ये परतलाय.

6 मॅचनंतर तो फॉर्ममध्ये आलेला

वॉशिंग्टन सुंदर पहिल्या 6 सामन्यात सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याची बॅट चालली. चेंडूनेही त्याने कमाल केली. सुरुवातीच्या 6 मॅचमध्ये त्याला एक विकेटही मिळाला नाही. दिल्ली विरुद्ध कसर त्याने भरुन काढली. 28 धावात 3 विकेट काढल्या. तीन विकेट त्याने एक ओव्हरमध्ये काढले. यात 5 धावा दिल्या. त्याशिवाय 15 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या.

फिल्डिंगमध्ये कमाल

ज्या मॅचमध्ये सुंदरने बॅट आणि बॉलने कमाल केली. त्याच सामन्यात त्याने चांगली फिल्डिंग सुद्धा केली. डेविड वॉर्नर, सर्फराज खान आणि अमन खान यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हैदराबादची वाढली चिंता

सुंदरला सूर गवसल्याने फ्रेंचायजीच टेन्शन सुद्धा कमी झालं होतं. कारण सुंदर ऑलराऊंडर आहे. पण आता पुढच्या सामन्याआधी सुंदर स्पर्धेबाहेर गेलाय. त्यामुळे फ्रेंचायजीच टेन्शन वाढलय. सनरायजर्स हैदराबादची टीम 29 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपला पुढ़चा सामना खेळणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.