AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 SRH vs MI Live Streaming | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

SRH vs MI Live Streaming | सनरायजर्स हैदराबादसमोर मंगळवारी 18 एप्रिल रोजी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान असणार आहे.

IPL 2023 SRH vs MI Live Streaming | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
| Updated on: Apr 17, 2023 | 9:58 PM
Share

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 25 वा सामना हा मंगळवारी 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व एडन मार्करम करणार आहे. तर मुंबई इंडियन्सची धुरा ही रोहित शर्मा याच्या खांद्यावर असणार आहे. सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या सुरु हंगामात एकूण 4 सामने खेळले आहेत. हैदराबादचा यापैकी 2 सामन्यात विजय झालाय. एडन मार्करमच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैजराबाद पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्सनेही आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर 2 मॅचमध्ये पराभव झालाय. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स उत्तम रनरेटमुळे गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड

सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 19 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. मुंबईने 19 पैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादने मुंबईवर 9 सामन्यात मात केली आहे. गेल्या 5 सामन्यांपैकी मुंबईने 3 वेळा विजय मिळवला. तर हैदराबादने 2 सामन्यात बाजी मारली. यानिमित्त आपण या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा मंगळवारी 18 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

सामना कुठे खेळवण्यात येणार?

हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना हा राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार?

हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. डिजीटल स्ट्रीमिंग जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. तसेच टीव्ही 9 मराठी वेबसाईटवरही अपडेट्स जाणून घेता येतील.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

सनरायजर्स हैदराबाद टीम | एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (वि.), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, मयंक डागर, विव्रत शर्मा , ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, अनमोलप्रीत सिंग, आदिल रशीद, अकेल होसेन, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, सनवीर सिंग, फजलहक फारुकी आणि नितीश रेड्डी.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.