
Bollywood Actress Khushi Mukherjee: भारताचा धडाकेबाज क्रिकेटर सूर्यकुमार यादव याची बदनामी केल्याप्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री मोठ्या अडचणीत आली आहे. वाद भडकल्यानंतर या अभिनेत्रीने हात जोडले आहेत. सेलिब्रिटी इमेज आणि पब्लिसिटी स्टंट केल्याप्रकरणात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या अभिनेत्रीवर बदनामी प्रकरणी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. खुशी मुखर्जी असं या अभिनेत्रीच नाव आहे. ती आता याप्रकरणी सरावासरव करत आहे. पोलिसांची या प्रकरणी एंट्री झाली असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
इन्फुलन्सरची वादात उडी
मुंबईतील सोशल मिडिया इन्फुलन्सर फैजान अन्सारी याने दावा केला आहे की, खुशी मुखर्जी हिने पब्लिसिटीसाठी, प्रकाश झोतात येण्यासाठी सूर्यकुमार यादवची बदनामी केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अन्सारीने तिच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तर तिच्यावर गुन्हा नोंदवत कमीत कमी 7 वर्षांचा तुरुंगवास करण्याची मागणी केली आहे. फैजान सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि तो सूर्यकुमार यादव यांच्या बदनामीप्रकरणी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहे.
खुशी मुखर्जीचा दावा काय?
खुशी मुखर्जीने एका कार्यक्रमात दावा केला की ती कोणत्याही क्रिकेटरच्या संपर्कात नाही. ती कोणत्याही क्रिकेटरला डेट करत नाही. सूर्यकुमार यादव तिला सातत्याने मॅसेज करायचा. पण आता त्यांच्यात कोणतीही चर्चा होत नाही. यादवसोबत आपलं नाव जोडल्या जाऊ नये असे ती म्हणाली होती. त्यावरून एकच वाद उफाळला. सूर्यकुमार यादव याच्याऐवजी त्याचे फॅन मैदानात उतरले. त्यांनी खुशीविरोधात कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. वाद वाढल्यानंतर खुशी मुखर्जीने आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपलं इन्स्टाग्रॅम खातं हॅक झाल्याचा कांगावा तिने केला. तर टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव याच्याशी चर्चा झाली होती. पण त्यात प्रेमाविषयी काहीच नव्हते. ती साधी चर्चा असल्याची कबुली तिने दिली आहे.
अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ
अर्थात सूर्यकुमार यादव या वादापासून दूर आहे. त्याची अथवा त्याच्या सहकाऱ्यांची याविषयी कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तो त्याच्या आगामी सामन्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. पण इन्फुलन्सर फैजान आणि चाहत्यांनी मात्र खुशीवर 100 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. गाझीपूर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तर खुशीविरोधात गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. तिला चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते. अर्थात ही तक्रार कोर्टात सिद्ध करण्याचे मोठं आव्हान यादवच्या चाहत्यासमोर आहे. पण एकंदरीत खुशीच्या अडचणीत वाढ झाली आहे.